Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाणी बचतीच्या संस्कारातून पाण्याचे जतन करू या – डॉ. सुब्रमण्यन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
पाणी बचतीच्या संस्कारातून पाण्याचे जतन करू या – डॉ. सुब्रमण्यन

जळगाव-(प्रतिनिधी)-पृथ्वीवर पाण्यावाचून कोणताही सजीव जगू शकत नाही. तो मानव असो, पशु-पक्षी, वृक्ष या अगदी पाण्यातील जीवजंतू या सर्वांना  पाणीच आवश्यक आहे. मात्र पाणी नसेल तर सजीवसृष्टीचे नसेल, त्यामुळे विद्यार्थीदशेतच पाणी बचतीचा संस्कार प्रत्येकाने रूजवून घ्यावा आणि संस्कारातून पाण्याचे जतन करावे आणि उज्ज्वल भविष्य घडावे असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ डॉ. सुब्रमण्यन यांनी केले.
जैन इरिगेशन, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जलसंरक्षण अभियानाअंतर्गत पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन, उपप्राचार्य रूपेश घाटगे, जैन इरिगेशनचे आनंद पाटील उपस्थित होते. रोपट्याला पाणी देऊन पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाद्वारे पाणी बचतीसह पाण्याविषयी संवेदनशील अशी रोचक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जात आहे. त्याद्वारे पाणीबचतीचे मार्ग विद्यार्थ्यांना गवसत आहे. उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना डॉ.सुब्रमण्यन यांनी सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी  पाण्याचे महत्त्व वैज्ञानिकदृष्टीने पटवून सांगितले. पाणी हे अमूल्य असून त्याचा जपून वापर केला पाहिजे कारण पाणी निर्मिती करणे आतापर्यंत वैज्ञानिक कसोटीवर शक्य झाले नसून पाण्याची बचत हीच  पाण्याची निर्मिती होय असेही त्यांनी स्पष्ट केले.

आनंद पाटील यांनी  पोस्टर प्रदर्शनामागील भुमिका स्पष्ट करताना सांगितले की, भारतीय संस्कृतीत पाण्याला देवासमान मानले असून त्याचा गुणधर्मामुळे पाणी देवत्व प्राप्त करते. त्यामुळे पाण्याची बचत करणारी पिढी घडावी यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी हितगूज करून पाण्याचे महत्त्व पोस्टर प्रदर्शनाद्वारे पटवून दिले जात असल्याचे ते म्हणाले. पाणी बचतीची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. यशस्वीतेसाठी जितेंद्र कापडे, सुनिलकुमार पाटील, रंजना गवळी, कीर्ती पाटील, हिरालाल गोराणे, अश्विनी बावस्कर यांनी सहकार्य केले. स्नेहा बागुल यांनी सुत्रसंचालन केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगांव जिल्हा आणि विधानसभा २०१९ च्या निवडणूकीतील इच्छुक नेतृत्व एक अवघड मीमांसा-डॉ धर्मेश पालवे

Next Post

जळके महावितरण शाखा कार्यालयात सामानाची तोडफोड

Next Post
जळके महावितरण शाखा कार्यालयात सामानाची तोडफोड

जळके महावितरण शाखा कार्यालयात सामानाची तोडफोड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d