Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगांव-(जिमाका) – शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत जळगांव जिल्ह्यात 4 लाख 78 हजार 109 शेतकरी लाभार्थी आहेत. जे लाभार्थी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सहभागी आहेत, परंतु त्यांना अजूनही किसान क्रेडीट कार्ड (KCC) मिळाले नाहीत. अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे, याकरीता विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत ज्या पात्र लाभार्थी शेतक-यांनी अद्याप कोणत्याही  वित्तीय संस्था व बँकाकडून पीक कर्ज घेतलेले नाही. अशा शेतक-यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

            देशातील शेतक-यांना बँकिंग क्षेत्राकडून पीककर्ज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी  विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अरुण प्रकाश, नाबार्डचे व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, सहकार उपनिबंधक मेघराज राठोड व  या यंत्रणेतील सर्व संबधित अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून संबंधितांना विशेष मोहिम राबविण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँक शाखाधिकारी यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करुन शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देशही दिले आहेत.

            शासनाच्या योजनांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बॅकांना उपलब्ध्‍ा करुन देण्यात आलेला आहे. लाभर्थी शेतक-यांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसलेबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बॅकेतून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्या बॅकेंत संपर्क साधावा. कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्था येथून पीक कर्ज न घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह  प्राप्त झाल्यापासून 15 दिवसामध्ये शेतक-यांना बँकांमार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेतंर्गत पीक कर्ज उपलबध करुन देण्यात येणार आहे. 

 सर्व तलाठी, बँक सखी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी गाव पावतळीवर यासाठी विशेष मोहिम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मू .जे महाविद्यालयात 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मोडी लिपी परिचय कार्यशाळा

Next Post

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

Next Post

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo