Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..!  शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..!  शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट


जळगाव दि. ७ प्रतिनिधी –  इंजिनिअरींग झाल्यानंतर वडीलांनी दोन पर्याय समोर ठेवले. काळ्या आईची सेवा की नोकरी.. यात शेतीला पुढील काळात भवितव्य आहे यामुळेच इंजिनिअरींग पेक्षा शेती करण्याचा पर्याय निवडला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, ऑटोमेशन, टिश्यूकल्चर या विकसीत तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यातूनच ५० एकर पासून ११० एकर शेती वाढवली. आज मध्यप्रदेशातील सर्वात समृद्ध गाव म्हणून दापोरा (जि. बुऱ्हाणपूर) आहे. फार्मर ते फॉर्च्युनर ही समृद्धी केवळ आधुनिक शेतीमुळेच साधता आली. असे अत्यंत प्रेरणादायी बोल योगेश्वर पाटील यांचे आहेत. भवरलालजी जैन यांच्या चरित्रातून आपल्याला शेती करण्याची प्रेरणा मिळाली असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

जैन हिल्सच्या आकाश मैदानावर झालेल्या या सुसंवाद कार्यक्रमात स्वप्नील प्रकाश महाजन, (वाघोदा ता. रावेर), प्रविण पाटील (महेलखेडी, ता. मुक्ताईनगर), गणेश तराळ, (अंतुर्ली ता. मुक्ताईनगर), अतुल उल्हास चौधरी (सांगवी, ता. यावल), प्रमोद बोरोले (साक्रीफेकरी ता. भुसावळ) या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी शेतकऱ्यांनी आपआपले अनुभव कथन केले. यात ‘फार्मसीचे शिक्षण होऊन औषधालय सुरू केले. यातून जनसंपर्क वाढला. आपल्या शिक्षणाचा, जनसंपर्काचा विधायक कार्यासाठी उपयोग व्हावा याच उद्देशाने स्वत: बरोबर इतरही पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारा प्रवास शिरपूर तालुक्यातील प्रगतशील युवाशेतकरी पद्माकर पाटील यांनी फालीच्या विद्यार्थ्यांसमोर आपला कृषिविकासाचा पट मांडला. फाली विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर स्वरूपात आपल्या कृषिज्ञानात भर पडेल अशा बाबी जाणून घेतल्या. यावेळी प्रायोजकत्व स्वीकारलेल्या कंपनी प्रतिनिधींदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फालीच्या तिसऱ्या टप्प्यात  पहिल्या दिवशी जैन इरिगेशनच्या शेती संशोधन केंद्रावरील प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी बघितले. यात फ्युचर फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक, जैन स्विट ऑरेंज, अति सघन पद्धतीने लागवड केलला आंबा, पेरू व अन्य फळबागांची भेट  दिली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी शेतावर जाऊन माहिती घेतली. 


आज कृषि बिझनेस मॉडेल व इन्होव्हेशनचे प्रदर्शन
गत १ जून पासून तिन टप्प्यात पार पडत असलेल्या फालीच्या नवव्या संमेलनास महाराष्ट्र, गुजरात मधील ग्रामीण क्षेत्रातील १०८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील उद्या दि. ८ जून ला तिसऱ्या टप्प्याचा समारोप होईल. यामध्ये ३१ बिझनेस व इन्होव्हेशन विद्यार्थी सादर करणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘या’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना मिळणार प्रसूती रजा….

Next Post

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन;फालीच्या नवव्या संमेलनाचा समारोप

Next Post
फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन;फालीच्या नवव्या संमेलनाचा समारोप

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा - अतुल जैन;फालीच्या नवव्या संमेलनाचा समारोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d