Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फॅशन डिसाईंनिंगच्या विद्यार्थीनींनी घेतल्या ड्रेस मेकिंग ते पॅकिंजिंग पर्यंतच्या टीप्स

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

निमजाई फाउंडेशनतर्फे औद्योगिक क्षेत्र पाहणी;एमआयडीसीतील ‘मयुरेश गारमेंट’ला दिली भेट

जळगाव- निमजाई फाउंडेशनतर्फे शासनाच्या कौशल्य विकास योजनेतंर्गत तरुणी तसेच महिला वर्गाला महागड्या फॅशन डिसाईंनिंगचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. फाउंडेशनतर्फेे अभ्यासमातंर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींनी शुक्रवारी मयुरेश गारमेंट या कंपनीला भेट दिली. या भेटीत विद्यार्थीनींनी कंपनीत ड्रेस तयार करण्यापासून तो पूर्ण झाल्यावर होत असलेल्या पॅकेजिंगपर्यंतची माहिती जाणून घेतली.

निमजाई फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत औद्योगिक क्षेत्र पाहणीत एमआयडीसीतील मयुरेश गारमेंट या कंपनीला शुक्रवारी दुपारी भेट दिली. मयुरेश गारमेंटच्या संचालिका किर्ती वारके, निमजाई फाऊंडेशनच्या अध्यक्षा शीतल पाटील आणि सचिव भूषण बाक्षे यांच्यासह 50 पेक्षा जास्त विद्यार्थीनींची उपस्थिती होती. भेटीत विद्यार्थीनींनी कंपनीत अंकित कुमार यांच्याकडून एकाचवेळी 500 पेक्षा जास्त कपड्यांच्या कटींग करणार्‍या कटर मशीनची माहिती घेतली तसेच प्रात्यक्षिकही अनुभवले. यानंतर विद्यार्थीनींना अंकित कुमार यांनी कंपनीत कपडे तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या अत्याधुनिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिलाई मशीनबद्दल माहिती दिली. यानंतर येथील कामगारांकडून ते करत असलेल्या कामाची माहिती दिली. यानंतर डे्रस तयार झाल्यानंतर त्याचे पॅकेंजिंगबद्दलही माहिती यावेळी देण्यात आली.

विद्यार्थीनींना रोजगारही देण्याची तयारी

अध्यक्षा शितल पाटील यांनी क्षेत्र भेटीसाठी मिळालेल्या संधीबद्दल कंपनीच्या किर्ती वारके यांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थीनींनी अभ्यासक्रमांपेक्षा प्रत्यक्षात काम कसे चालते याबाबत ज्ञान मिळाल्याचे वारके यांना सांगितले. यावेळी किर्ती वारके यांनी फाऊंडेशनमध्ये शिक्षण घेत असलेल्या ज्या विद्यार्थीनींना कंपनीत काम करण्याची तयारी असेल, त्यांना मानधन तत्वावर रोजगार देण्याची मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किशोर पाटील, महेश पाटील, दिपक जावळे, विवेक जावळे, रुपम जावळे, कुणाल कोलते, शिक्षिका रंजना पाटील, हेमलता इंगळे, अर्चना पाटील, रुपाली पाटील, योगीता सपकाळे, भाग्यश्री चौधरी, पूनम चौधरी, नितू चौधरी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रशांतराज तायडे यांना राज्यस्तरीय मौलाना आझाद लोकमित्र सन्मान पुरस्कार जाहीर

Next Post

जळगाव रोटरी ईस्टतर्फे विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी मोफत शिबिर

Next Post
जळगाव रोटरी ईस्टतर्फे विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी मोफत शिबिर

जळगाव रोटरी ईस्टतर्फे विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी मोफत शिबिर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo