Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड;पुण्याला होणार राज्यस्तरीय स्पर्धा; निवड खेळांडूंना चषक देऊन गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2026
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड;पुण्याला होणार राज्यस्तरीय स्पर्धा; निवड खेळांडूंना चषक देऊन गौरव

जळगाव – (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील आठ व ७ वर्ष वयोगटातील दोन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १९ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा १५ ते १७ मे २०२६ दरम्यान पुणे येथे होणार आहे. तर सात वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा ३० ते ३१ मे २०२६ ला पुणे येथे होतील. या स्पर्धांसाठी १९ वर्षाआतील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत मुलांमध्ये जळगावचा तसीन तडवी तर मुलींमध्ये पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे प्रथम, तर ७ वर्ष आतील गटात पाचोर्‍याचा विहान वाघ प्रथम देव वेद द्वितीय यांची निवड झाली आहे. विजेत्यांचे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकाऱ्यांनी कौतूक केले.

मुलांच्या गटातून तसीन रफिक तडवी, कुशान ज्ञानदेव चौधरी, पियुष माळी, जामनेरचा उदय पाटील तर मुलींच्या गटातून पाचोराची ऋतुजा बालपांडे, स्वरा वाघ, जळगावची हर्षदा पाटील, पालवी गणेश माळी, यांनी राज्यस्तरीय फेरीत प्रवेश मिळवला. तर सात वर्षे वयोगटात पाचोर्‍याचा विहान वाघ, देव वेद यांची निवड झाली. अश्वतसिंग राजपूत भुसावल, ज्ञानदा मनोरे चोपडा यांना उत्तेजनार्थ पारतोषिक देण्यात आले. कांताई सभागृहात येथे झालेल्या निवड चाचणीत सहा फेऱ्यांमधून जिल्ह्यातील एकूण ४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रत्येकी चार मुलं व चार मुलींची निवड करण्यात आली. तर सात वर्षे वयोगटात दोन मुले यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध वयोगटांतील विजेत्यांना चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले. तर तर उत्तेजनार्थ रुद्रांश चेतन तायडे, दुर्वेश कोळी, द्रोणा जामले, श्री शर्मा, भावेश सोनार, कार्तिक कासार, गौरव बारी, चिन्मय मगर, अभंग सोनवणे यांना मेडल देऊन गौरवण्यात आले. पारितोषिक वितरण जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सय्यद मोहसिन, किशोरसिंह शिसोदिया, जैन इरिगेशन मिडीया विभागाचे देवेंद्र पाटील, बुद्धिबळ प्रशिक्षक परेश देशपांडे, प्रमुख पंच प्रवीण ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोहारा विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल 89.01 % यशाची परंपरा कायम!!!

Next Post

लोहारा विकासोच्या चेअरमनपदी जयेंद्र डांबरे तर व्हाईचेअरमन पदी भगवान खरे

Next Post
लोहारा विकासोच्या चेअरमनपदी जयेंद्र डांबरे तर व्हाईचेअरमन पदी भगवान खरे

लोहारा विकासोच्या चेअरमनपदी जयेंद्र डांबरे तर व्हाईचेअरमन पदी भगवान खरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo