Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव पोलिस स्टेशन मार्फत ग्रामसुरक्षा दलाची स्थापना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगांव पोलिस स्टेशन मार्फत ग्रामसुरक्षा दलाची स्थापना

गेल्या काही दिवसांपासून भडगाव शहरी भागात तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी आता ग्राम संरक्षक दल स्थापन केली आहेत. या ग्राम संरक्षण दलाच्या माध्यमातून ग्रामीण भागात तसेच शहरी भागात गस्त घालण्यात येणार आहे.

भडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुमारे 60 गावे आहेत. पोलीस कर्मचारी संख्या त्याहीपेक्षा कमी असल्याने ग्रामीण भागातील पशुधन, शेतातील ठिबक नळ्या, विहिरीच्या मोटरी, मोटरसायकली, गुरे चोरीचे प्रमाण वाढले होते. म्हणून मा. पोलीस अधीक्षक सो जळगाव डॉ. श्री प्रवीण मुंडे यांचे आदेशान्वये भडगाव पोलीस स्टेशन राज्यातील ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दल तसेच शहरी भागात पोलीस मित्र तयार करण्यात आले आहेत. भडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील आतापावेतो गोंडगाव, वडगाव सतीचे, महिंदळे, बांबरुड, वडजी, बात्सर, लोण पिराचे, भातखंडे, गिरड, मांडकी, वलवाडी, पिंप्रिहाट, पिचर्डे, निंभोरा, तांदुळवाडी, पांढरद, नालबंदी, पळासखेडा, कोळगाव, वाडे, आमडदे, गुढे, कजगाव, भडगाव या 25 गावांमध्ये ग्रामसुरक्षा दल पोलिस मित्रांची दिनांक 10/03/2022 रोजी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक रावजी ऊतेकर यांनी स्थापना केली आहे. ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना चांगलाच आळा बसणार आहे. सदर बाबत ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व पोलिस मित्रांची तसेच सर्व पोलीस पाटील बांधवांची पोलीस स्टेशनला मिटिंग घेण्यात आली आहे.

मीटिंग दरम्यान त्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आले आहेत. ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व पोलीस मित्र यांना पोलीस स्टेशनच्या वतीने ओळखपत्र व इतर साहित्य देण्यात आले आहे. सदर ग्रामसुरक्षा दल स्थापन करणेकामी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक ऊतेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष गोपनीय पोलिस कर्मचारी विलास पाटील, स्वप्नील चव्हाण तसेच संबंधित पोलीस पाटील बांधवांनी विशेष काम पाहिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

देशमुख महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Next Post

सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव येथे एस एस सी परीक्षा बैठकव्यवस्था

Next Post

सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव येथे एस एस सी परीक्षा बैठकव्यवस्था

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo