Thursday, March 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई(प्रतिनिधी) – राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने अधिकृत पत्रक काढून याबाबतची माहिती दिली. त्यामुळे रावसाहेब दानवेंऐवजी आता चंद्रकांत पाटील राज्याचे भाजप अध्यक्ष असतील, तर आशिष शेलार यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदाचा कारभार मंगलप्रभात लोढा हे सांभाळणार आहेत. 
भाजप खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज दिल्लीत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांच्याकडे राज्यमंत्रिपदाचा भार आहे. ते ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. या शर्यतीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनाच पसंती होती. अखेर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुका या पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. तर राज्याच्या कॅबिनेटपदी वर्णी लागल्यानंतर आशिष शेलार यांच्याकडील मुंबई भाजप अध्यक्षपद काढून घेत त्या पदावर आमदार मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गुरुपौर्णिमेनिमित्त खासदारांच्या हस्ते प्रेरणादायी आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा गौरव

Next Post

भडगाव ग्रामिण रूग्नालय उप जिल्हारूग्नालयाच्या श्रेणीवर्धन मध्ये समाविष्ट-आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Next Post
भडगाव ग्रामिण रूग्नालय उप जिल्हारूग्नालयाच्या श्रेणीवर्धन मध्ये समाविष्ट-आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

भडगाव ग्रामिण रूग्नालय उप जिल्हारूग्नालयाच्या श्रेणीवर्धन मध्ये समाविष्ट-आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d