Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मनपाने शाळा तोडून विद्यार्थ्यांना आणले रस्त्यावर-परेश चौधरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
मनपाने शाळा तोडून विद्यार्थ्यांना आणले रस्त्यावर-परेश चौधरी

मुंबई – (हर्षल भोईर) – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या भिवंडी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेली मराठी शाळा पालिकेच्या जलअभियंता ने धोकादायक ठरवून जमीनदोस्त केली. परंतु विद्यार्थ्यांना पर्यायी शाळेची व्यवस्था न करता त्यांच्या शिक्षणाचे तीन तेरा बीएमसी प्रशासनाने वाजवले आहेत. एकीकडे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब हे मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याहेतू अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करीत असताना त्याच ठाकरे सरकारच्या मुंबई महानगरपालिकेने मराठी शाळा बंद करण्याचा जणू चंगच बांधलेला दिसत आहे.

मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येलाच मराठी शाळेतील विद्यार्थी हे मंदिराच्या व पडक्या इमारतीच्या आवारात तसेच पटांगणातील झाडाखाली शिक्षण घेत असल्याचे भिवंडी तालुक्यातील धामणगाव ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या मनपाच्या शाळेत दिसून येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पिसे पांजरापुर येथील गोडाऊन शाळेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून देण्यात आली होती. परंतु त्या गोडाऊनला लागूनच पालिकेचा डिझेल पंप व ऑइल प्लांट असल्याने विद्यार्थ्यांसाठी सदरील जागा अतिधोकादायक होती म्हणून ह्या पर्यायी व्यवस्थेला पालकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. पालिकेने शाळेला दिलेली पर्यायी जागा आधीच्या शाळेपासून ६ किमी लांब अंतरावर असल्याने विद्यार्थी पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो. ह्या शाळेत शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी हे आदिवासी असल्याने त्यांच्या पालकांना हे परवडण्याजोगे नाही.

संबंधित विषयाची तक्रार मनसेकडे येताच क्षणी मनविसे तालुका अध्यक्ष परेश चौधरी विभाग अध्यक्ष ऍड सुनील देवरे, पिके पाटील, भावेश पाटील यांनी शाळेची भेट घेत विद्यार्थी पालकांच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना पत्र देत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे व त्यांच्यासाठी शाळेसाठी पर्यायी व्यवस्था जवळपास करण्यात यावी अशी मागणी केली.

तसेच येत्या १० दिवसात ह्या विद्यार्थ्यांच्या पर्यायी शाळेची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात शाळा सुरू करण्यात येईल असा दमच तालुकाध्यक्ष परेश चौधरी ह्यांनी दिला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खान्देश रत्न सोहळा पुरस्कार 2022 उत्साहात संपन्न

Next Post

खान्देशातील पहिल्या वहीगायन महोत्सवाचे जळगावात आयोजन

Next Post

खान्देशातील पहिल्या वहीगायन महोत्सवाचे जळगावात आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo