Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराणी ताराराणी यांची समाधी बांधण्याची परवानगी द्यावी- वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात भारताच्या इतिहासामध्ये महिलांनी कर्तुत्व गाजवल्याच्या घटना आहेत. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी लोककल्याणकारी स्वराज्याची संकल्पना मांडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी या संकल्पनेला मूर्त रूप दिले व त्याचा विस्तार छत्रपती संभाजी महाराज यांनी घडवून आणला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या विरोधात लढण्यासाठी राजाराम महाराजांनी प्राणांतिक लढा दिला मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम ७ वर्ष तेवत ठेवला तो राजाराम महाराज यांच्या पत्नी, छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या महाराणी ताराराणी यांनी होय. महाराणी ताराराणी या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या स्त्री शक्तीचे प्रतीक आहेत. पती मेल्यानंतर सती न जाता छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला औरंगजेबा पासून वाचविण्यासाठी थेट औरंगजेबाशी विजयी लढा दिला. मराठ्यांचे स्वराज्य औरंगजेब आपल्या हयातीमध्ये घेऊ शकला नाही. औरंगजेबाचा इतिहासकार खाफिखान म्हणतो, “ताराराणी ही राजाराम महाराजांची थोरली बायको, बुद्धिवान व शहाणी होती. सैन्याच्या नेतृत्वाच्या आणि मोहिमांच्या नियोजनाच्या राज्यकारभाराचे गुण तिच्यात प्रकर्षाने प्रकट झाले.”  महाराणी ताराराणी यांची समाधी साताऱ्यापासून ६-७ किमी अंतरावर असणाऱ्या संगम माहुली या गावात नदीकाठी आहे. ही समाधी जेव्हा आपण पाहतो, तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. आम्ही ती समाधी पाहिली व मन विषन्न झाले. मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करणाऱ्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा साधा चबुतरा सुद्धा नाही. मातीमध्ये दगडी चौसरा केला असून त्यावर प्लास्टिकच्या पुड्या, बाटल्या अशी घाण दिसली. भारतीय पुरातत्त्व विभाग व महाराष्ट्र शासन यांना आम्ही  विनंती करतो की, ही समाधी जर तुमच्याने बांधली जात नसेल तर समाधी बांधण्याची पूर्ण जबाबदारी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद घेत आहे. आपण समाधी बांधण्याची परवानगी द्यावी. आम्ही समाधी बांधून त्याच्या लोकार्पणाला आपल्यालाच आमंत्रित करु. असे  निवेदन जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तसेच पुरातत्त्व विभागाला पाठवण्यात आले. निवेदन देते वेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री रुपेश महाजन, जिल्हाकार्याध्यक्ष शिवश्री मनोज बाविस्कर, शिवश्री रोहन महाजन आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नमो गंगे राज्यस्तरीय प्रथम ऑडिशन उत्साहात,पुढील झेप दिल्लीत

Next Post

…याला म्हणतात खरं प्रेम

Next Post

…याला म्हणतात खरं प्रेम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d