Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मनपा सहाय्यक आयुक्तांवर कठोर कारवाईची मागणी….

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/12/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मनपा सहाय्यक आयुक्तांवर कठोर कारवाईची मागणी….

जळगाव – (प्रतिनिधी) – शहरातील लोक टाइम्स न्युज चे पत्रकार विक्रम कापडणे हे महानगर पालिकेत बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता यांचा कॅमेरा हिसकावून घेणे व त्यातील मेमरी कार्ड काढणे, दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून लोकशाहीचा आवाज दाबनाऱ्या मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रूले यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह जळगाव शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार विक्रम कापडणे हे जळगाव महानगरपालिकेच्या लेखा विभागाच्या बाहेर कॅमेऱ्याने शूटिंग करत असताना, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे तेथे आले आणि त्यांनी त्यांचा कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून घेतला एका कर्मचाऱ्याजवळ दिला आणि त्यातील मेमरी कार्ड काढून घेतले. त्यानंतर महानगरपालिकेतून निघून जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी विक्रम कापडणे यांनी सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात तक्रार क्रमांक: ७२३/२०२४ कायदेशीर कलम: कलम ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात, विशेषतः सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शूटिंग करणे कायदेशीर आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी अरेरावी केली व अधिकाराचा गैरवापर करत कॅमेरा काढून घेतला. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून सहाय्यक आयुक्तांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकारांसह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. वस्तुनिष्ठ बातम्या या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करत असतात मात्र काही अधिकार्‍यांकडून सातत्याने पत्रकारांना त्रास दिला जातो. अशाच पद्धतीचा त्रास जळगाव मनपाचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्याकडून संबंधित पत्रकाराला देण्यात आलेला आहे. तरी या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच यापुढे सर्व कार्यालयांना पत्रकारांना माहिती देण्या संदर्भात नियमावली जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रूले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त

Next Post

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतीची संस्मरणीय भेट

Next Post
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतीची संस्मरणीय भेट

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतीची संस्मरणीय भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d