Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेकडील 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेकडील 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) :-   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून सदर वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in   या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) प्रसिध्द करण्यात आले आहे.

                    शासनामध्ये मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन -2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादिंकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. जेणेकरुन, आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधीमंडळातही अनेकवेळा चर्चा झाली असून त्यावेळी विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून यासंदर्भात दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

शासनाकडून संबंधित संवर्ग / पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे अंदाजित  वेळापत्रक प्रस्ताविक करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल, वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, अंदाजित वेळापत्रकाबाबची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.

                संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशिल जाहिरात/अधिसूचनेव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल  असे सह सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुबंई, सुनिल अवताडे यांनी  प्रसिध्दीस दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथे प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे झालेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमात प्रत्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली जनसुनावणी

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे झालेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमात प्रत्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली जनसुनावणी

जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे झालेल्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमात प्रत्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली जनसुनावणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo