Sunday, December 7, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मित्रांचा पार्टीचा आग्रह आणि 4 वर्षाच्या चिमुकलीचे पितृछत्र हरपले.

Desk Team by Desk Team
01/04/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
जवळपास 50 मीटर ट्रक ने फरफटत नेले.

मित्रांचा पार्टीचा आग्रह तरुणाच्या जीवावर बेतला, परतताना घडले धक्कादायक, ४ वर्षांच्या चिमुरडीचे पितृछत्र हरपले
Jalgaon News
: जळगावात बांभोरी पुलाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे एका ४ वर्षांच्या चिमुरडीचे पितृछत्र हरवले आहे.
April 1, 2023
जळगाव : जळगाव शहरातील बांभोरी पुलानजीक हॉटेल गिरणाई समोर महामार्गावर ट्रकने दुचाकीवरील तरुणाला चिरडल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अक्षय भेंडे (वय ३२ वर्षे, राहणार- वर्धा, सध्या रामानंदनगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. अक्षय याला त्याच्या मित्रांनी पार्टीचा आग्रह केला. यास अक्षयने नकार सुध्दा दिला होता. त्यानंतरही तो मित्रांच्या आग्रहास्तव पार्टीला गेला. याच दरम्यान पार्टी करून परत निघाला असता, त्याचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

वर्धा येथील मूळ रहिवासी असलेला अक्षय हा जळगाव शहरातील एका फायनान्‍स कंपनीत नोकरीला होता. शुक्रवारी फायनान्स कंपनीने दिल्यानुसार ३१ मार्चचे टार्गेट अक्षय यांच्यासह त्याच्या फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या अक्षयच्या सहकारी मित्रांनी पूर्ण केले. टार्गेट पूर्ण झाल्याने मित्रांनी शनिवारी हॉटेलात पार्टीचा बेत आखला. जळगाव शहरातील हॉटेल गिरणाई या ठिकाणी पार्टी करण्याचे ठरल्यावर अक्षयचे मित्र पोहचले. मित्रांनी अक्षयलाही पार्टीचा आग्रह धरला, अक्षयने सुरुवातीला नकार दिला. मात्र यानंतर तो मित्राच्या आग्रहास्तव पार्टीला सर्वात उशिरा पोहचला.

ज्या हॉटेलात पार्टी करून आले त्याच हॉटेलच्या समोर अनर्थ घडला
गिरणाई या हॉटेलात पार्टी आटोपल्यानंतर सर्व मित्र बाहेर पडले. हॉटेलबाहेर उभी केलेली MH 32.R 4072 या क्रमाकांची दुचाकी काढली. हॉटेलकडून बाहेर पडल्यावर महामार्गावर दुचाकी घेत असतांना एम.एच.४९ ए.टी.४४०७ या क्रमाकांच्या १२ चाकी ट्रकने जोरदार धडक दिली. यात मागच्या चाकाखाली आल्याने अक्षयचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात एवढा भयंकर होता की,

मृतदेहाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. यावेळी अक्षयच्या मित्रांनी प्रचंड आक्रोश केला. तो पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. मयत अक्षयच्या पश्चात पत्नी आणि एक चार वर्षाची मुलगी आहे.
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत होवून महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली, अन दुचाकीला धडक देणाऱ्या तसेच अक्षयच्या मृत्यूस कारणीभूत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Desk Team

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आईने बापाचा खून केला,पोलिसांसमोर बनाव रचला,पण 36 दिवसांनी मृत्यूच…

Next Post

जळगावात उद्या व पर्वा राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन.

Next Post

जळगावात उद्या व पर्वा राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d