Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे कविसंमेलन रंगले; ऑनलाईन मिळाली रसिकांची दाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

ग्रामीण मुस्‍लिम मराठी साहित्य चळवळ व महाराष्ट्र राज्य आयोजित रविवारी (ता.२१) झालेल्या एकदिवसीय दुसऱ्या ऑनलाइन साहित्य संमेलनात व्याख्यान व कवी संमेलन अशा दोन सत्रात संमेलन घेण्यात आले. त्‍याला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्‍थानी कवी ॲड. हाशम पटेल (लातूर), तर उद्‍घाटक म्‍हणून प्रख्यात समिक्षक प्रा. डॉ. अक्रम पठाण (नागपूर) तर प्रमुख पाहुणे म्‍हणून कवी के. टी. काझी (औसा), ॲड. जमील देशपांडे (जळगाव), हबीब भंडारे (औरंगाबाद) यांची उपस्‍थिती होती. पहिल्या सत्रात प्रा. डॉ. अक्रम पठाण यांनी ‘मुस्‍लिम मराठी साहित्य पार्श्चभुमी’ या विषयावर विचार मांडले. मराठी मुसलमान या फेसबुक पेजवरून ते लाईव्ह दाखविण्यात आले.

निमंत्रित कवींचे कवीसंमेलन दुसऱ्या सत्रात कवी ॲड. हाशम इस्‍माईल पटेल यांच्या अध्यतेखाली निमंत्रित कवींचे कवीसंमेलन उत्‍साहात पार पडले. त्‍यांनी त्‍यांची शालेय अभ्यासक्रमाला असलेली ‘शांतीगीत’ या शीर्षकाची कविता सादर केली. कवी के. टी. काझी यांनी ‘काजळ’ या कवितेतून ठारच मारायचंय मला तर तलवार नको, पाजळ साहिल कोणा दुसऱ्यासाठी सजव, तु नयनात काजळ अशी परोपकार दाखविणारी कविता सादर केली. ॲड. जमील देशपांडे यांनी
पितृ दिना निमित्त सादर केलेल्या कवितेला दाद मिळाली. त्‍यांनी बापाच्या खांद्यावर खेळताना आनंद होता, अश्रू खुप गेली जेव्हा बापाचा जनाजा होता खांद्यावर ही कविता सादर केली. कवी चांद तरोडकर यांनी खड्डा मनात मोठा, खोदून पाहतो, दुःखास त्‍यात आता लोटून पाहतो, स्‍वप्नात चांद माझ्या येईल काय ती, चल मग उगल आता झोपून पाहतो, ही कविता सादर केली. कवियत्री अनिसा शेख (पुणे) यांनी स्‍त्रीवादी कविता सादर केली. मी आजची नारी अबला नाही, कमजोर तर नाहीच नाही, आवाज उडवते अन्याया विरुध्द, वावड्या नजरांना सोडणार नाही. कवी वाय. के. शेख यांनी तुझ्याच लकबी, तुझ्यास सवयी, काळजात माझ्या बसली कवीता. कवयित्री शब्‍बाना मुल्‍ला यांनी शेतकरी कविता सादर केले. माझ्या सोन्याचा संसार, जरी पोट शेतावर, घाम गळाते अंगाचा, रोज काळ या मातीवर , कवी अहमद पिरनसाहब यांनी बोलतो मराठी, लिहतो मराठी, ऐकतो मराठी, आवडीने हा संदेश दिला.
कवी हबीब भंडारे यांनी सुन्या माळावर दर्गा, नेटात ऊरुसामधी गजबजलेली दुआ मागताना नवसाची, वचन ओठात कुजबुजलेली ही तुरबतीला आले गहिरेपण ही कविता सादर केली. कवी दाम्‍पत्य जाकीर तांबोळी व सफुरा तांबोळी यांनीही यात सहभाग घेत कवियत्री सफुरा तांबोळी यांनी कोरोनाच्या काळात ओढ लागली. मला माहेरची, माझ्या आईच्या प्रेमळ कुरवाळायची, ओढ लागली मला माहेरची माझ्या बापाच्या वत्‍सक नजरेची तसेच कवी दिलशाद सय्यद अहमदनगरकर यांनी संत गाडगेबाबा यांच्यावरील अंभग सादर केला. गरीबाचे वाली, अनाथाचे साथी, खापरच माथी, सदोदित स्‍वच्‍छतेचा नारा, घरोघरी दिला, धावे सफाईला, अंगणातही सफाईच ही कविता सादर केली. या संमेलनात कवी जाकीर तांबोळी, कवयित्री जस्‍मीन शेख, कवी बा. ह. मगदूम , ॲड. शेख इक्‍बाल रसुलसाब, अख्तर शेख, बी. एल. खान यांनीही कविता सादर केल्या. कवी खाजाभाई बागवान यांनी सूत्रसंचालन केले तर कवी शफी बोल्‍डेकर यांनी आभार मानले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ऑनलाईन पद्धतीने दोन दिवसीय पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

अभ्यागतांच्या भेटीसाठी जिल्हाधिकारी सोमवार व गुरुवार उपलब्ध असणार

Next Post
अभ्यागतांच्या भेटीसाठी जिल्हाधिकारी सोमवार व गुरुवार उपलब्ध असणार

अभ्यागतांच्या भेटीसाठी जिल्हाधिकारी सोमवार व गुरुवार उपलब्ध असणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo