Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“राज्य नाट्य” स्पर्धेचा “पडदा” आज उघडणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणार्‍या 59 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धांना आज (दि.15) पासून सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. महानगरपालिकेचे आयुक्‍त उदय टेकाळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणीताई खडसे खेवलकर व ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी प्रमुख पाहुणे राहतील, अशी माहिती स्पर्धेच्या समन्वयक सरिता खाचणे यांनी दिली.
आज (दि.15) रोजी सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटन झाल्यानंतर लगेचच 7 वाजता उत्कर्ष कलाविष्कार भुसावळचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या नाटकाचा प्रयोग होणार आहे.राज्य नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्राच्या या प्राथमिक फेरीत दि. 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत एकूण 21 नाटके सादर होणार आहे. दररोज सायंकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता सादर होणार्‍या या नाटकांमध्ये जळगाव, भुसावळ, धुळे व इंदौर येथील नाटकांचा समावेश आहे. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे नाट्यरसिकांना पर्वणीच ठरणार आहे.
स्पर्धेसाठी नाममात्र म्हणजे फक्त १५/- व १०/- तिकीट दर आहे. या रक्कमेतून अर्धी रक्कम नाटक सादर करणाऱ्या संस्थला दिली जाते. जळगांव कर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने या मेजवानी च आनंद घ्यावा, आणि या हौशी कलाकारांच्या कलेला आवर्जून दाद द्यावी, असे आवाहन समन्वयिका सरिता खाचणे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती विद्यालयात बालदिनानिमित्त पारंपरिक खेळाने फुलविले विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर हास्य

Next Post

नोबेल स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या “बालदिन” अनोख्या पद्धतीने साजरा

Next Post

नोबेल स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या "बालदिन" अनोख्या पद्धतीने साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo