Thursday, October 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रानडुकराची शिकार करणाऱ्या दोघांना वन कोठडी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
रानडुकराची शिकार करणाऱ्या दोघांना वन कोठडी

जळगाव, (जिमाका) दि. 3 – तालुक्यातील देव्हारी येथे अवैधरित्या रानडुकराची शिकार करणाऱ्या अशोक खेमा चव्हाण (वय 57 वर्षे) मोहन खेमा वंजारी (वय 50 वर्षे) दोन्ही रा. देव्हारी, ता. जळगाव या दोघांना जळगाव वन परिक्षेत्राच्या पथकाने रानडुकराचे मास, शिकारीच्या साहित्यासह ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता, दोघांना तीन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती जळगावचे वन परिक्षेत्र अधिकारी आर. जी. राणे यांनी दिली आहे.
जळगाव तालुक्यातील देव्हारी गावातील मोहन वंजारी व अशोक चव्हाण या दोघांनी वन्यप्राणी रानडुकराची अवैधपणे शिकार केल्याची माहिती उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांना मिळाली. त्यानुसार होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक चिमाजीराव कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. राणे, विटनेर वनपाल गोकूळ चौधरी, वनपाल पी. जे. सोनवणे, वनरक्षक दिपक पाटील, अभिमन मोरे, सी. व्ही. पाटील, महिला वनरक्षक आश्‍विनी ठाकरे, वैशाली साळी, वाहनचालक डी. डी. पवार यांच्या पथकाने देव्हारी गाव गाठले. याठिकाणी शेतात रानडुकराचे मास भाजत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पथकाने दोघांकडून 17 किलो मास, कुऱ्हाड, विळा हे शिकारीचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी वनविभागात वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी आर. जी. राणे करीत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा पहिला स्थापना दिना निमित्त उत्तर महाराष्ट्रातील जळगाव विभागात संघटनेचा विस्तार

Next Post

सुप्रीम कॉलनीतील पाण्याच्या टाकीचे काम अंतीम टप्प्यात!महापौरांनी केली पाहणी : मुख्य जलवाहिनीची लवकर जोडणी करण्याच्या सूचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo