Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम पाडले बंद

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम पाडले बंद

जळगांव(प्रतिनिधी)- भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण तर्फे आकाशवाणी चौक, ईच्छा देवी चौक व अजिंठा चौफुली येथे सर्कलचे काम सुरू करण्यात आलेले होते.

जळगाव शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता याठिकाणी होणाऱ्या सर्कलच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होऊन लहान मोठे अपघात होऊन जिवीत हानी होण्याची शक्यता लक्षात आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी उपरोक्त नमुद तिन्ही चौकात सर्कल होऊ नये व उड्डाणपुल बांधण्यात यावे, यामागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व प्रकल्प अभियंता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, जळगाव यांना देण्यात आले होते.

परंतु 5-6 दिवस उलटुन देखील सदर निवेदनाची दखल न घेतल्याने आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचे व जीवघेणे ठरणारे आकाशवाणी चौकातील सर्कलचे निकृष्ठ बांधकाम आंदोलन करून बंद करण्यात आले. आंदोलन स्थळी जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कानडे या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांच्यात समन्वय घडवुन आणण्याचा प्रयत्न केला.

परंतु आंदोलक हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने चर्चेतून जनहिताचा मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनि चर्चा करण्यासाठी बोलवले आहे असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.

जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी आंदोलकांच्या मागणीप्रमाणे आकाशवाणी चौक, ईच्छादेवी चौक व अजिंठा चौफुली येथे उड्डाणपुल बांधणेकामी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याबाबत आश्वस्त केले. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सर्कलचे काम सुरू असल्याने जास्त जागा व्यापली आहे म्हणून नागरिकांना ट्रॅफिकचा त्रास होत आहे पण सर्कल पूर्ण झाल्या नंतर नागरिकांना जास्त जागा वापरासाठी मिळेल व ट्रॅफिकची समस्या होणार नाही. असे भारतीय राष्ट्रीय राजमार्गाच्या अधिकाऱ्यांचे मत असल्याचे सांगितले.

पण सर्कलचे काम पूर्ण होऊन देखील जर नागरिकांना गैरसोयीचे वाटत असेल तर निश्चितच सर्कलचा व्यास कमी करण्यात येईल. याविषयी सबंधित अधिकारी व मक्तेदार त्यांच्याकडून लेखी घेण्याबाबत आश्वस्त केले. सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अशोक लाडवंजारी, सुनील माळी, मंगला पाटिल, नामदेवराव चौधरी, रवींद्र नाना पाटिल, अमोल कोल्हे, विनोद देशमुख, सुशील शिंदे, किरण राजपूत, राजू मोरे, अशोक सोनवणे, जितेंद्र बागरे, भगवान सोनवणे, नाईम खाटिक, डॉ. रिजवान खाटिक, राहुल टोके, रमेश बहारे, मुविकोराज कोल्हे, मनोज वाणी, सुदाम पाटिल आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२१ ची ८.८९ टक्के दराने परतफेड

Next Post

दुबार मतदार नोंदणी होवू नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

Next Post
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

दुबार मतदार नोंदणी होवू नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d