Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन


जळगाव-(प्रतिनिधी) : ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी यात मोठया प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छ्ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिगंबर लोखंडे यांनी केले आहे.
या स्पर्धेत दोन वेगवेगळया भागातील विषयात लघुपटाची निर्मिती करुन स्पर्धकाने आपली वैध व सक्रिय ई-मेल आयडीसह हा लघुपट You-Tube वर अपलोड करावा. अपलोड केलेली लिंक स्पर्धकाने http:www.mygov.in/ या संकेतस्थळावर स्पर्धेच्या अर्जासह 20 जुलै, 2021 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.


स्पर्धेसाठी भाग एक करीता हागणदारीमुक्त लघुपट निर्मिती करावयाची असून यासाठी जैव- विघटनशील कचरा व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल हे विषय आहेत. यासाठी प्रथम पारितोषिक 1 लाख 60 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक 60 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 30 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. भाग- 2 साठी भौगोलिक परिस्थितीवर आधारित लघुपट निर्मितीचे करावयाची आहे. यासाठी विषय- वाळवंट क्षेत्र, डोंगराळ प्रदेश, सागरी किनारपट्टी लगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूरप्रवण क्षेत्र हे देण्यात आले आहेत. याकरीता प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, व्दितीय पारितोषिक 1 लाख 20 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 80 हजार रुपये असे असणार आहे. प्रत्येक क्षेत्राकरिता प्रथम, व्दितीय, तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.


सहभागासाठी मार्गदर्शक सूचना

केंद्र व राज्य सरकारच्या पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी, सदस्य आणि त्यांचे नातेवाईक वगळता 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. संस्थात्मक श्रेणीत, ग्रामपंचायती, समुदाय आधारित संस्था, स्वयंसेवी संस्था, बचत गट देखील सहभाग घेऊ शकतात. लघुपटांचा कालावधी कमीत कमी 1 ते 5 मिनिट असावा. केवळ ग्रामीण भागातील वातावरणात निर्मिती केलेले लघुपटच या स्पर्धेसाठी स्विकारले जातील. स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी सर्व स्पर्धकांनी संकेत स्थळावरील नियम व अटींच्या अधीन राहून आवेदन व अर्ज सादर करावेत. सदर लघुपटनिर्मिती स्पर्धेमध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिगंबर लोखंडे यांनी केले आहे.


टीप-अधिक माहितीकरिता खालील लिंक पाहावा- https://innovateindia.mygov.in/sbmg-innovation-challenge/

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एस एस बी टी “बी. फार्मसी“ चा निकाल जाहीर

Next Post

नाशिक विभागीय भरारी पथकाची परराज्यातील अवैद्य मद्य तस्करी वाहतुक विरोधात कारवाई;एक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त

Next Post

नाशिक विभागीय भरारी पथकाची परराज्यातील अवैद्य मद्य तस्करी वाहतुक विरोधात कारवाई;एक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo