Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेल्वे प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस अनिवार्य

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
रेल्वे प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस अनिवार्य

मुंबई(प्रतिनिधी)- वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जल पुरवठा आदी सेवेतील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

यापुर्वी अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून अशा कर्मचाऱ्यांना लसीकरणातून सूट दिल्या गेली होती. मात्र आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या शिवाय रेल्वेचा पास मिळणार नाही.

राज्य शासनातर्फे यासंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात म्हटले की, आवश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे न बघता रेल्वेचा पास देण्यात येत होती परंतु आता लसीकरणाला सुरुवात होऊन बराच वेळ झालेला आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाची प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लसींचा साठाही मुबलक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांमार्फत लसींचा पुरवठाही सुरळीत होत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशी संबंधिताना लस अनिवार्य करण्यात आली आहे.

राज्य शासनाने ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी लसीकरण झालेल्या व्यक्तींची व्याख्या केली होती. त्यामध्ये ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहे आणि दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेले आहे. परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले की, रेल्वे मध्ये प्रवास करण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी पूर्ण लसीकरणाची अट घालण्यात आली होती याचा विस्तार करून आता यात आवश्यक सेवेतील तसेच शासकीय सेवेतील लोकांना सामील करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यापुढे प्रवासासाठी सार्वत्रिक (युनिव्हर्सल) पास अशाच व्यक्तींना दिला जाईल जे आवश्यक सेवेतील असो किंवा नसो परंतुवरील“संपूर्ण लसीकरण” झालेल्या व्यक्तींच्या व्याख्येत मोडतील. त्याचप्रमाणे लोकल किंवा पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी मासिक त्रैमासिक सहा मासिक पास त्याच प्रवाशांना देण्यात येईल ज्यांचे संपूर्ण लसीकरण झालेल्यांमध्ये वरील व्याख्येप्रमाणे गणले जातील.

Team Satymev Jayate

Previous Post

इटलीचे भारतातील राजदूतांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

Next Post

बचत गटांच्या यशकथा लिखाणाची स्पर्धा

Next Post
बचत गटांच्या यशकथा लिखाणाची स्पर्धा

बचत गटांच्या यशकथा लिखाणाची स्पर्धा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo