Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोकसंघर्ष मोर्चाच्या मायेच्या शिदोरीत ८० हजार लोकांनी घेतला लाभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- शहरातील प्रभात चौकात सुरू असलेल्या लोक संघर्ष मोर्चाच्या कॅम्प  मायेच्या शिदोरीत जवळ जवळ ८० हजार लोकांनी लाभ घेतला आहे. त्यात झारखंड, पश्चिम बंगाल, उडीसा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्प्रदेश  बिहार व महाराष्ट्र येथील  प्रवासी कष्टकरी लोकांनी  लाभ घेतला असून अजूनही कॅम्प सुरूच आहे. प्रवासी मजुरांसाठी मोफत जेवण, थंड पाणी, चहा-नाश्ता, चप्पल, औषधी, मेडिकल असिस्टन्स पुरवण्याचा सलग पंधरा दिवस  सुरूच आहे.लोकसंघर्ष मोर्चाद्वारे आयोजित प्रवासी मजूर अन्नछत्र चालवण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चा प्रतिभा शिंदेंनी पुढाकार घेतल्यावर त्यांना सोबत क्रेडाई, वाजिद फाउंडेशन, महेश चावला, विनोद नाथांनी  अशोक मंधान, सुजित पाटील, राजेश पाटील, प्रमोद पाटील, योगेश पाटील, जळगाव सर्कल योगेश ननवरे, चंदन भाऊ चोपडा, कास्ट्राईब संघटना, जळगाव तिन्ही तलाठी, श्रीकांत मोरे, किरण वाघ, फकीरा सपकाळे, तासिमभाई, गौतम सपकाळे, सिद्धार्थ शिरसाट, किरण भोळे, दामू भारंबे, सुमित साळुंके, अनील सपकाळे, कलिंदर तडवी, विजया नेरकर आदी सर्वांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून सर्व आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रवाशांची सेवा करत आहेत. याठिकाणी 20 तारखेपर्यंत ट्रकने जाणारे जवळपास दहा ते बारा हजार लोक दररोज आपली भूक भागवत होते. 20 तारखेनंतर प्रवाशी मजुरांचे प्रमाण कमी होवून आजपर्यंत रोज चार ते पाच हजार लोक या सुविधेचा लाभ घेतला असल्याचे लोकसंघर्ष मोर्चा प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आज आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Next Post

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना समान न्याय प्रदान करणेबाबत “मासू” च्या वतीने राज्य समितीचे प्रमुख आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांना ई-मेल द्वारे निवेदन

Next Post
अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय राज्य सरकारनेच घ्यावा-महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु ) ची मागणी

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना समान न्याय प्रदान करणेबाबत "मासू" च्या वतीने राज्य समितीचे प्रमुख आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांना ई-मेल द्वारे निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo