लोहारा – (प्रतिनिधी) – धी.शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉ.जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथील विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा एसएससी परीक्षेचा निकाल89.01% लागलेला आहे. या परीक्षेसाठी 182 विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी 162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये कु मानसी समाधान काळे हिने 97.80% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला कु.साक्षी नरेंद्र पालीवाल हिला 96. 20 टक्के मिळाले द्वितीय क्रमांक मिळवला कु. समीक्षा शिवाजी क्षीरसागर 95.80% तृतीय क्रमांक मिळवला तर कु. ऐश्वर्या जयंत क्षीरसागर 93.20% मिळवून चतुर्थ क्रमांक मिळाला तर कु.प्रज्ञा नाना माने हिने 92.60% गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला विद्यालयाचा सेमी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागलेला असून यावेळेस 90% पेक्षा जास्त गुण मिळणारे दहा विद्यार्थी आहेत.या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब संजयराव भास्करराव गरुड व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके, सचिव सागरमलजी जैन, सहसचिव यु. यु. पाटील सर कार्यालयीन प्रमुख भाऊसाहेब दीपक रावजी गरुड वस्तीगृहप्रमुख गोपाळराव सूर्यवंशी संस्थेचे संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव आनंदराव पाटील उपाध्यक्ष अ.अ. पटेल सर तंटामुक्ती अध्यक्ष युवानेते मयुर जैस्वाल ग्रा.प. सदस्य आबा चौधरी ,ईश्वर देशमुखo, गजानन क्षिरसागर सुरेश मोरे, सुरेश पाटील, अर्जुन पाटिल पत्रकार ईश्वर खरे, दिनेश चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत ,चंदु खरे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. सुर्वे उपमुख्याध्यापक एस.व्ही. शिंदे सर तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक वाय. व्हि. चौधरी सर एन. एस .चौधरी सर उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने स्थानिक सल्लागार समितीच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.









