Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2026
in जळगाव, रोजगार
Reading Time: 1 min read
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

जळगाव- (जिमाका)- केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय मार्फत देशभरातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव मिळावा यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या तिसऱ्या फेरीत जळगाव जिल्ह्यात एकूण ३२ इंटर्नशिप संधी उपलब्ध झाल्या असून, जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप दिली जाणार असून, दरमहा ९,००० रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच रुजू झाल्यानंतर ६,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. विप्रो इंटेरप्रायझेस येथे सुरक्षा (safety) क्षेत्रासाठी १२ वी उत्तीर्ण असलेल्या एकूण ०१ जागा, अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रासाठी IT। उत्तीर्ण असलेल्या एकूण ०५ जागा, प्रोडक्शन (Production) क्षेत्रासाठी १२ वी उत्तीर्ण असलेल्या एकूण १५ जागा, एच. आर. (HR – Human Resources) क्षेत्रासाठी पदवीधर उत्तीर्ण असलेल्या एकूण ०१ जागा, तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ‘सेल्स अँड मार्केटिंग’ क्षेत्रासाठी १० वी उत्तीर्ण पात्रता असलेल्या एकूण ९ जागा भरल्या जातील, तर अशोका बिल्डकॉन लिमिटेड येथे ‘ह्युमन रिसोर्स’ (HR) पदासाठी पदवीधर उमेदवाराची १ जागा आहे.

या योजनेमुळे तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासोबतच आर्थिक लाभही होणार असल्याने ही एक महत्त्वाची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव (दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९०) येथे संपर्क साधावा किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

Next Post

लोहारा विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल 89.01 % यशाची परंपरा कायम!!!

Next Post

लोहारा विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल 89.01 % यशाची परंपरा कायम!!!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo