Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थी केंद्रित मूल्यांकन पद्धतीचा विस्तार करूया- डॉ ए बी चौधरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

फैजपूर-(मलिक शकिर) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे राज्यातील एक अग्रगण्य विद्यापीठ असून विद्यापीठ प्रशासन आणि प्राध्यापक यांच्या परस्पर सहकार्याच्या माध्यमातून आणि चर्चेतून मूल्यांकन पध्दती संबंधी काही त्रुटी असतील तर त्या चर्चेअंती सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन प्रा डॉ एबी चौधरी, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा क ब चौ उ म वि जळगाव यांनी फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित उत्तरपत्रिका मूल्यांकन मार्गदर्शन कार्यशाळेच्या औचित्याने परिसरातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ ए बी चौधरी हे होते. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यापीठ प्रशासनातील मान्यवरांचे आणी यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर आणि भुसावळ आदी तालुक्यातील प्राध्यापकांचे महाविद्यालयात स्वागत केले आणि कर्तव्याचा भाग न समजता चांगल्या मानसिकतेतून विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्याचे परस्पर सहकार्यातून ध्येय साध्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील परीक्षा व मूल्यमापन मंडळा चे संचालक प्रा डॉ बी पी पाटील यांनी सखोल सांख्यिकीय माहिती च्या आधारे उत्तरपत्रिका मूल्यांकन मार्गदर्शन कार्यशाळा चा उद्देश उपस्थितांसमोर मांडला. त्यांनी प्राध्यापकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून भावी पिढी घडविण्यात प्राध्यापकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केले. प्राध्यापक संघटनांच्या वतीने एन मुक्ता संघटनेचे अध्यक्ष प्रा नितीन बारी तसेच एन मूकटो संघटनेचे अध्यक्ष प्रा डॉ संजय सोनवणे तसेच एन मुक्ता संघटनेचे सचिव प्रा डॉ अविनाश बडगुजर यांनी प्राध्यापकांची ची भूमिका विद्यापीठ प्रशासनासमोर मांडली. प्राध्यापक संघटनेच्या वतीने उत्तरपत्रिका मूल्यांकनाच्या बाबतीत प्राध्यापकांच्या भूमिकांचा विचार करून आवश्यक ते बदल करावेत असे मत त्यांनी मांडले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा डॉ ए बी चौधरी, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, श्री बी पी पाटील, संचालक परीक्षा मूल्यमापन मंडळ, प्रा नितीन बारी अध्यक्ष एन मुक्ता प्रा डॉ संजय सोनवणे, अध्यक्ष एन मुक्ता, प्रा डॉ अविनाश बडगुजर, सचिव एन मुक्ता, श्री आर पी पाटील, सहाय्यक कुलसचिव, प्रा डॉ के जी कोल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, श्री एस बी हातागडे, कक्षाधिकारी श्री अनिल आर वाणी, वरिष्ठ सहाय्यक यांच्यासोबत परिसरातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक- प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र राजपूत यांनी तर आभार श्री आर पी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, शेखर महाजन, चेतन इंगळे, धनू माळी, गुलाब वाघोदे, यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मतदारसंघाच्या विकासासाठी शिरीषदादांना निवडून देण्याचा निर्धार

Next Post

भडगावात १२रोजी राष्ट्रवादीचा भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन;व्यापारी बांधवामध्ये उत्साहाचे वातावरण

Next Post

भडगावात १२रोजी राष्ट्रवादीचा भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन;व्यापारी बांधवामध्ये उत्साहाचे वातावरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo