Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळणार आता रिल्सवर….

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/05/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळणार आता रिल्सवर….

ठाणे- सध्या समाजमाध्यमांवर रिल्सची क्रेझ वाढली आहे. विशेषतः तरुणांमध्ये रिल्स लोकप्रिय आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अशा प्रकारच्या रिल्सच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्याचे पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या रिल्सचे अनावरण ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज झाले. रिल्सच्या माध्यमातून शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे श्री. शिनगारे यांनी सांगितले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, प्र. जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे आदी उपस्थित होते. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक व ट्विटर अकाऊंटवरून हे रिल्स प्रसिद्ध केले जाणार आहेत.जिल्हा नियोजन समितीच्या अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांना निधी वितरित करण्यात आला होता.

सन 2022-23 या वर्षाच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालय ठाणे यांनी विविध उपक्रमाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रसिद्धी केली. यामध्ये जिल्ह्यातील विविध गावांमध्ये लोककला, पथनाट्याच्या माध्यमातून योजना पोचविण्यात आल्या.प्रसिद्धी मोहिमेचा भाग म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रसिद्धी समाज माध्यमातून करण्यासाठी रिल्सचा वापर करण्याचे नियोजन जिल्हा माहिती कार्यालयाने केले.

अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गासाठी असलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, यूपीएससीच्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी आर्थिक मदत, स्टँडअप इंडिया, शेतकऱ्यांना मिनि ट्रॅक्टर, रमाई आवास योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, मुलींसाठी असलेल्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, परदेशात उच्च शिक्षणासाठी मदत या योजनांचे रिल्स तयार करण्यात आले. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने केलेला राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने राबविलेले उपक्रम अतिशय उपयुक्त आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचल्यास त्या योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल. अधिकाधिक योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावे, असे जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Previous Post

१२ वी पास मुलगा असा बनला करोडपती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Next Post

आजपासून होणार तुमच्या खिशावर परिणाम; जाणून घ्या सविस्तर माहिती

Next Post
आजपासून होणार तुमच्या खिशावर परिणाम; जाणून घ्या सविस्तर माहिती

आजपासून होणार तुमच्या खिशावर परिणाम; जाणून घ्या सविस्तर माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo