Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरातील समाजसेवकांचा शेलवड येथील निराधार मुलांच्या बालगृहास मदतीचा हात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(चेतन निंबोळकर)- मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची आत्मीयता असते आजच्या धकाधकीच्या जीवनात इतरांविषयी सहानभूती निर्माण होणारे क्षण विरळच असतात.असे सर्वश्रृत घडत असले तरी आज ही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय जळगांव येथील समाजसेविका सौ. निशा पवार व त्यांच्या समाजसेवक सहकार्‍यांनी शेलवड ता.बोदवड येथील निराधार बालगृहातील मुलांना जीवनावश्यक वस्तू देऊन दाखवून दिला. येथिल समाज कल्याण अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या श्री गजानन महाराज बालगृहातील ३०मुलांना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सुमारे ३० विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू तसेच शैक्षणिक साहित्य दिले.

देण्यात आलेल्या साहित्यामध्ये शालेय साहित्य बॉल पेन,स्केच पेन पाकीट, क्रिडा साहित्य, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू जसे की, अंगाला लावायचे साबण, डोक्याला लावण्याचे तेलाच्या बाटल्या, कोलगेट, ब्रश, पावडर चे डबे,कपडे धुण्यासाठी साबण, कंगवे, बिस्कीट पाकीट, चॉकलेट तसेच कॅरम बोर्ड,बॅटमिंटन या सर्व वस्तू यावेळी देण्यात आल्या.  यावेळी, उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे तेथील विद्यार्थाच्या चेहर्‍यावर हास्य निर्माण झाले. यावेळी समाजसेविका सौ. निशा पवार, मौलाना आझाद फाऊंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख ,मिना परदेशी, सुनीता अग्रवाल,  हर्षल सर, साळूंखे सर,चेतन निंबोळकर,चैतन्य पवार, देवश्री पवार,आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जीवघेना आणि धोकादायक ‘सफर’

Next Post

सविता ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Next Post
सविता ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सविता ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo