Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा

पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला – खाजगी शिक्षण संस्था चालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यार्थ्यांसाठी लागणारी वह्या पुस्तके, गणवेश इ. साहित्य खरेदीची पालकांना सक्ती करता येत नाही. तशी त्यांनी केल्यास त्यांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित संस्थाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

यासंदर्भात अकोला येथे पालकांचे शिष्टमंडळ श्री.कडू यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी पालकांनी तक्रारीचे निवेदन देऊन संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांना लागणारी वह्या पुस्तके, शालेय गणवेश व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी शाळांकडूनच किंवा शाळेने नेमून दिलेल्या विक्रेत्याकडूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते, याबद्दल आपली व्यथा मांडली. त्यावेळी संबंधित पालकांना आश्वस्त करताना श्री. कडू म्हणाले, शिक्षण संस्थाचालक अशाप्रकारे सक्ती करु शकत नाही. तसा त्यांना अधिकार नाही. आपल्या पाल्यासाठी आवश्यक शालेय साहित्य, वह्या पुस्तके, प्रयोग वही इ. तसेच अन्य साहित्य हवे तेथून घेऊ शकतात. पालकांनी संस्थाचालकांविरुद्ध संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे निर्देश श्री. कडू यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही वेळचे वेळी आढावा घेऊन पालकांच्या तक्रारींचे निराकरण करावे,असे निर्देश श्री. कडू यांनी दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नागरिकांचे सहकार्य व प्रशासनाच्या सूक्ष्म नियोजनामुळे धारावीत ‘कोविड’वर नियंत्रण – पालकमंत्री अस्लम शेख

Next Post

सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी इतरत्र वळविण्यात आलेला नाही

Next Post
सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी इतरत्र वळविण्यात आलेला नाही

सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी इतरत्र वळविण्यात आलेला नाही

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo