Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री संत सावता माळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चोपडा तहसीलदार यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
श्री संत सावता माळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चोपडा तहसीलदार यांना निवेदन

11 मे प्रशासकीय स्तरावर महात्मा दिन म्हणून साजरा करावा यासंदर्भात निवेदन तहसीलदार अनिल गावित साहेब यांना देण्यात आले.

महाराष्ट्र भूषण लोकनेते संस्थापकअध्यक्ष सचिनभाऊ गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व फुलेप्रेमींना श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या कडून आवाहन करण्यात आले होते की, ११ मे “महात्मा दिन” साजरा करण्यात यावा कारण ११ मे १८८८ रोज़ी ज्योतीबा फुलेंना “महात्मा” ही पदवी लोकांनी बहाल केली होती. दलित आणी निराधारांना न्याय मिळावा या करीता ज्योतीबांनी ‘ सत्यशोधक समाज’ चीं स्थापना केली. त्यांची समाजसेवा पाहुन ११ मे १८८८ रोज़ी मुंबई येथे एका विशाल सभेत लाखोंच्या उपस्थितीत त्याना “महात्मा” ही पदवी बहाल करण्यात आली. ज्योतीबा फुले यांना त्यांनतरच “महात्मा ज्योतीबा फुले” या नावाने जगभरात ओळखले जाऊ लागले . ‘महात्मा’ ही पदवी लोकांकडुन, जनतेकडुन प्राप्त करनारे संम्पुर्ण जगात “महात्मा फुले” हे पहीले समाजसुधारक आहेत. म्हणुनच “महात्मा दिनास” महत्व आले आहे.


आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतीकारक म्हणुन त्यांना ओळखले जाते. त्यांनी ब्राम्हण – पुरोहित यांच्याशिवाय विवाह संस्कार सुरु केले. आणि यास मुंबई हायकोर्टाची मान्यता सुद्धा मिळवली . तसेच मराठीत मंगल अष्टके सुद्धा लिहीली.ते बालविवाह विरोधात आणी विधवा विवाहाचे समर्थक होते. आपल्या जिवनाच्या कार्यकाळात त्यांनी भरपुर पुस्तकें लिहीली. जसे तृतीय रत्न , छत्रपती शिवरायांचा पवाडा, शेतकर्यांचा आसुड, गुलामगिरी, आदी. महात्मा फुलेंनी केलेल्या एकत्रित संघर्षामुळे सरकारला अँग्रीकल्चर अँक्ट पास करावा लागला होता. सन १८४८ मध्ये भारतातील पहीली मुलींची शाळा , भीडेवाडा , पुणे येथे काढली.आणी पत्नी सावित्रीबाई फुलेंना भारतातील पहील्या शिक्षिका तसेच मुख्याध्यापीका बनविले.
शिवजयंतीचे जनक, तसेच आंबेडकरांचे गुरु हे महात्मा फुले आहेत. त्यामुळेच शिवजयंती, आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंतीप्रमाणेच “महात्मा दिन” साजरा केला जावा, याकरीता श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य ही संघटना २०१६ पासुन प्रयत्न करत आहेत. मागील वर्षी ११ मे रोज़ी महाराष्ट्रातील सुमारे १८ जिल्ह्यांत “महात्मा दिन” साजरा केला गेला.


प्रशासकीय स्तरावर सुद्धा महात्मा दिन साजरा करण्यात यावा या आशयाचे निवेदन तहसीलदार चोपडा यांना देण्यात आले.
त्याप्रसंगी उपस्थित खान्देश विभागीय संपर्क प्रमुख समाधान माळी सर जिल्हाध्यक्ष महेंद्र महाजन जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन सर शहर अध्यक्ष रोहित माळी राजेंद्र माळी दिपक माळी समवेत सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हायजीन रेटिंग आणि इट राईट कॅम्पस प्रमाणपत्रांचे झाले वाटप

Next Post

जळगाव जिल्हा १७ वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ जाहीर

Next Post
जळगाव जिल्हा १७ वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ जाहीर

जळगाव जिल्हा १७ वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo