Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संतुलित आहाराने मिळेल परिपूर्ण पोषण – डॉ. मिलींद निकुंभ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
संतुलित आहाराने मिळेल परिपूर्ण पोषण – डॉ. मिलींद निकुंभ

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव व जिल्हा परिषद, जळगाव यांच्यातर्फे पोषण माहच्या निमित्त वेबिनारचे आयोजन

जळगाव(प्रतिनिधी)- परिपूर्ण पोषणासाठी संतुलित आहार अत्यंत महत्वाचा असतो. आपल्या आहारात षडरसांचा समावेश असेल तर तो परिपूर्ण ठरतो आणि शरीरासाठीही पोषक होतो. असे प्रतिपादन जळगावच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद निकुंभ यांनी केले.

ते भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातंर्गत कार्यरत क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव तर्फे ‘पोषणासाठी योग आणि आयुष’ विषयावर आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते. पोषण माहच्या निमित्ताने जिल्हा परिषद, जळगावच्या सहकार्याने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. निकुंभ पुढे म्हणाले की, शरीराचे वय आणि अवस्थेनुसार आहारात समुचित बदल केले तर कोणत्याही वयात माणूस निरोगी राहू शकतो. यावेळी बोलताना एम जे कॉलेजच्या सोहम योग आणि निसर्गोपचार विभागाच्या माजी संचालिका डॉ आरती गोरे म्हणाल्या की, कोणताही आजार झाल्यावर त्याच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या चिकित्साप्रणाली महत्वाच्या आहेत. पण त्याहीपेक्षा आजार होऊच नये यासाठी योग आणि निसर्गोपचाराची मदत घेतली तर अधिक उत्तम. निरोगी आयुष्यासाठी फक्त आहाराच नाही तर विहार आणि विचार ही तेवढेच महत्वाचे आहे. अष्टांग योगाच्या अनुपालनाने माणूस मन आणि शरीर दोन्ही निरामय आणि निरोगी राखून उत्तम आयुष्य जगू शकतो.

या वेबिनारमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प, जळगाव जिल्ह्याच्या पर्यवेक्षिका शितल निंबाळकर व चाळीसगाव तालुक्याच्या राजदेहेरे गावच्या अंगणवाड़ी सेविका सरला देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे म्हणाले की, मागील दिड वर्षात कोविडच्या महामारीमुळे सर्वांना आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याचे महत्व पटले आहे. पोषण चांगले असेल तरच प्रतिकारशक्ती चांगली असू शकते. पोषणाला जर आपण योग आणि पर्यायी पारंपरिक चिकित्सा पद्धतींची जोड दिली तर आपण कोणत्याही आजाराला समर्थपणे सामोरे जाऊ शकतो. वेबिनारचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहायक क्षेत्रीय अधिकारी प्रदीप पवार यांनी केले. पत्र सूचना कार्यालय, मुंबई व प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश) चे सर्व जिल्ह्यातील अधिकारी, यूनिट इन्चार्ज आणि कर्मचारी, अंगणवाड़ी सेविका, मदतनीस, आशा, बचतगटाचे सभासद व इतर लाभार्थी या वेबिनार मध्ये सहभागी झाले होते. हे वेबिनार यूट्यूबवर उपलब्ध आहे.

इच्छुकांना https://www.youtube.com/watch?v=pPnGPN2cwGY या लिंकवर हे वेबिनार बघता येईल याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रिय लोकसंपर्क ब्यूरो, जळगावतर्फे करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिवस साजरा

Next Post

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

Next Post
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo