Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्नपदार्थ मिळावेत यासाठी विशेष मोहीम -अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत ‘अन्न सुरक्षा सप्ताह’ राबवा -मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

मुंबई(प्रतिनिधी)- दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फूड, खवा, मावा, मिठाई व इतर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखून नागरिकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फूड, खवा, मावा व इतर अन्नपदार्थ मिळावेत याची खबरदारी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत घेतली जात आहे. मात्र जनतेनेही मिठाई खरेदी करताना त्यावर बेस्ट बिफोर (Best Before) ची तारीख नमूद आहे किंवा कसे याबाबत खात्री करूनच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

प्रशासनामार्फत निय‍मितपणे दरवर्षी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी इत्यादी सणांच्या काळात खाद्यतेल, खवा, तयार मिठाई, मिठाईसाठी लागणारे कच्चे अन्नपदार्थ यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे या अन्नपदार्थांचे उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते आस्थापनांची सखोल तपासणी करून अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येतात. विश्लेषण अहवालात नमूद उल्लघनांनुसार कायद्यातील तरतुदीच्या अनुषांगाने कारवाई केली जाते. अन्न पदार्थांची गुणवत्ता अबाधित रहावी, याकरिता तसेच अन्नपदार्थांच्या भेसळीस आळा बसावा व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री थांबविण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

सणासुदीच्या कालावधीत जनजागृती ग्राहक व अन्न व्यावसायिकात भेसळयुक्त अन्नपदार्थांबाबत जागृती करण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येतात.अन्नपदार्थांत भेसळीस आळा घालण्यासाठी प्रशासनामार्फत राज्यभरात अन्नपदार्थ उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते यांच्या नियमित तपासण्या करून नमुने घेण्याची कार्यवाही निरंतर केली जाते .सणासुदीच्या काळात विशेष मोहिमा आखून नागरिकांना र्निभेळ व सकस मिठाई, दुध, खवा, मावा, खाद्यतेल इ. अन्न पदार्थ मिळावेत याची खबरदारी घेतली जाते.दुध व दुग्धजन्य पदार्थांबाबत जकातनाका मोहिम व अन्य मोहिम आखून छापे टाकून कारवाई केली जाते.

नोंदणी प्रमाणपत्र घेऊनच व्यवसाय करावा दिवाळीच्या काळात काही विनापरवाना आस्‍थापनाद्वारे चॉकलेट्स, दिवाळीचे फराळ इत्यादी तयार करून दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येतात. अन्नपदार्थांच्या पॅकेटवर कोणत्याही प्रकारचे लेबल नसते. अशा विनापरवाना आस्थापनांनी अन्न व्यवसाय करणेपुर्वी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना / नोंदणी प्रमाणपत्र घेऊनच व्यवसाय करावा व नियमानुसार अन्नपदार्थांच्या पॅकेटवर लेबल लावावे. जनतेने असे विना लेबेलचे खाद्य पदार्थ खरेदी करणे व खाणे टाळावे.

ग्राहकांनी पॅकींग किंवा सीलबंद अन्नपदार्थ खरेदी करताना अन्नपदार्थांच्या लेबलवर अन्न पदार्थाचे नाव, घटक पदार्थ, nutritional information, वेज -नॉन वेज लोगो, additives, उत्पादकाचे पूर्ण नाव व पत्ता, वजन, लॉट नं., उत्पादन दिनांक/ पॅकिग दिनांक, Best Before दिनांक / use by date, fssai परवाना /नोंदणी क्रमांक इ . माहिती नमूद असल्याची खात्री करूनच अन्न पदार्थ खरेदी करावीत.मिठाई पॅकबंद किवा सीलबंद अन्नपदार्थ, कच्चे अन्नपदार्थ इत्यादी नोंदणी धारक/ परवाना धारक आस्थापनेतूनच खरेदी करावीत. मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ते शिळे नसल्याची खात्री करूनच खरेदी करावीत व विक्रेत्यांकडून त्याबाबत खरेदी बिल घ्यावे. फेरीवाल्यांकडून खवा, मिठाई घेणे टाळावे. उघड्या वरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.

तक्रार असेल तर संपर्क कराराज्यातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अन्नपदार्थाबाबत घडलेल्या घटना तसेच अन्नपदार्थाच्या गुणवत्तेसंदर्भात जागरूक रहावे तसेच तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. राज्यातील नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या gov.in या संकेतस्थळावर Grievance portal वर अतिशय सहज व सोप्या पद्धतीने online तक्रार नोंदवू शकतात. प्राधिकरणाच्या संकेतस्थळाबाबतची माहिती जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचावी म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे.प्रशासनाचे मुंबई येथील मुख्यालयात 24×7 चे अवलंब करून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

दूरध्वनी क्रमांक 022-26592364/65, 26592373/1820 व फॅक्स नं. 26591959 व ई-मेल – [email protected] व [email protected] हे आहेत. टोल फ्री क्रमांक 1800222365 हा पण 24×7 च्या धर्तीवर कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तसेच नागरीक प्रशासनातील सर्व जिल्हा कार्यालयात दुरध्वनीद्वारे किंवा ईमेलद्वारे तसेच लेखी निवेदनाद्वारे संपर्क साधुन भेसळयुक्त पदार्थांबाबत तक्रार नोंदवू शकतात. प्रशासनामार्फत तक्रारीची त्वरीत दाखल घेण्यात येईल, असेही अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस न घेतल्यास वेतन रोखणार; जिल्हाधिकाऱ्यांचे कोषागार अधिकाऱ्यांना निर्देश

Next Post

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर

Next Post
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d