Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सत्पात्री मतदान हाच खरा संविधानाचा सन्मान – जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/01/2022
in विशेष
Reading Time: 1 min read

  राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन

नाशिक : दिनांक २५ (जिमाका वृत्त) – ‘जेव्हा चांगले लोक मतदान करत नाहीत तेव्हा वाईट लोक निवडून येतात’, विसंगती अशी की, असे बोलणारेच लोक मतदान करण्याबाबत दक्ष नसतात. लोकशाहीत वाईट प्रवृत्तींना रोखायचे असेल तर भारतीय संविधानातून घटनाकारांनी आपल्याला मतदानाचे भेदक अस्र बहाल केलंय. या अस्राचा अचूक वापर करावयास हवा. अमिष, प्रलोभन, पैसा, दडपण याररख्या कुठल्याही प्रवृत्तीला बळी न पडता सामाजिक व संसदीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवर्जुन मतदान केले पाहिजे. ‘सत्पात्री मतदान करणे म्हणजे संविधानाचा सन्मान राखणे,’ हाच सन्मान भारतीय मतदारांकडून घटनाकारांना अपेक्षित आहे, असे प्रतिपादन आज जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी केले आहे.

ते आज महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दूरदृष्य प्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. नंदू पवार, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. कुणाल वाघ अंतर्गत गुणवत्ता विभागाच्या प्रा. डॉ. मृणाल भारद्वाज, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. राकेश पाटील, प्रा. कल्पना निकम, सर्व पर्यवेक्षक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. राजपूत म्हणाले,आपले मत कोणालाही असो किंवा एकालाही नसो पण आपण कर्तव्य म्हणून मतदान केले पाहिजे कारण ती आपली संविधानिक जबाबदारी आहे. ते कर्तव्य लोकशाहीप्रती, देशाप्रती किंवा आपल्याप्रती असते, आपल्या भविष्याच्या हितासाठी असते. ही जाणीव ठेवून आवर्जुन मतदान केले पाहिजे. आपले भविष्य कसे असावे हे आपल्या मतदानाने ठरत असते, कारण आपल्या देशाचा कारभार पाहणारे कारभारी आपण मतदानातून निवडत असतो. घटनाकारांना अपेक्षित असलेल्या मतदानाच्या अधिकाराचा अर्थ नीट समजून घेण्याची गरज आहे. भारताची लोकशाही ही लोकांनी सामाजिक लोकशाहीतून चालवलेली राज्यपद्धती आहे. पण देशातला प्रत्येक नागरीक संसदेत अथवा विधिमंडळात कारभारावर चर्चा करू शकत नाही, म्हणून त्याने आपले प्रतिनिधी विधिमंडळात पाठवून त्यांच्यामार्फत देशाचा कारभार पहावा अशी अपेक्षा आहे. हे प्रतिनिधी जेवढे चांगले असतील तेवढा देशाचा कारभार चांगला होईल आणि लोकांच्या हिताचा होईल. मात्र याबाबतीत प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपले मत व्यक्त केले पाहिजे. जे लोक मतदान करणार नाहीत ते स्वत:ची जबाबदारी व कर्तव्याबाबत उदासीन होते, म्हणून देशाचा भविष्यकाळ त्यांना कधीच माफ करणार नाही, असेही श्री. राजपूत यांनी यावेळी सांगितले.

“विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची तत्वे व मूल्ये रुजवण्याची महत्वपूर्ण भूमिका शिक्षकांची असते. सुजाण विद्यार्थी घडला तरच सुजाण मतदार तयार होईल व लोकशाही अबाधित राहील.” असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. जगदाळे यांनी अध्यक्षीय मनोगतात अधोरेखित केले. “मतदान हक्क नसून, एक कर्तव्य आहे. समाजातील सर्व घटकांनी मतदानाचा हक्क बजावला तर ते राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत मोठे योगदान देऊ शकतील” असेही त्यांनी नमूद केले.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. कुणाल वाघ यांनी केले. यावेळी त्यांनी मतदार दिन साजरा करण्याचे ध्येय व उद्धिष्ट स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच मतदानाचे महत्व समजले तर सुयोग्य शासन प्रणाली विकसित होईल तसेच एक सक्षम राष्ट्र तयार होईल असे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. राकेश पाटील यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार प्रा. कल्पना निकम यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा ग्रामीण व जिल्हा महानगर तर्फे भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post

जिल्ह्यात २८१ कोविड-१९ रुग्णांची नोंद;तालुकानिहाय आकडेवारी

Next Post
जिल्ह्यात ३३८ कोविड-१९ बाधित रुग्णांची नोंद

जिल्ह्यात २८१ कोविड-१९ रुग्णांची नोंद;तालुकानिहाय आकडेवारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo