Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सॅम्पल तपासणीची क्षमता वाढविण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सॅम्पल तपासणीची क्षमता वाढविण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रयोगशाळा प्रमुखांसोबत बैठक

 पुणे दि.11: पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांनी  कोविड-19 च्या सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली.

Maha Info Corona Website

विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि खासगी प्रयोगशाळा प्रमुख व समन्वयकांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, साखर आयुक्त तथा कोविड-19 नियंत्रण अधिकारी सौरभ राव, एनआयव्ही च्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख तसेच शासकीय व खाजगी प्रयोगशाळेचे प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांमध्ये सध्या मोठया प्रमाणात कोविड-19 चे सॅम्पल तपासणीसाठी येत आहेत. विशेष करुन पुणे महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढत असल्याने या भागातून सॅम्पल अधिक येत आहेत. या सॅम्पल तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. प्रयोगशाळांसाठी लागणारे  पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक असणाऱ्या मशिनरी तसेच इतर साहित्य गरजेनुसार प्रशासनाकडून पुरवले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रयोगशाळांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सांगून जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, आवश्यक बाबींसाठीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे  तात्काळ सादर करावेत, जेणेकरून त्याची पूर्तता करता येईल.

सौरभ राव म्हणाले, झोपडपट्टी परिसरात एक ते दोन खोल्यांच्या छोट्या घरांमध्ये 5-6 व्यक्ती राहतात, त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नाही. तसेच स्वच्छतेच्या नियमांचे पालन काटेकोरपणे होत नसल्यामुळे या भागातील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांवर वेळेत उपचार होऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सॅम्पल टेस्टिंग चे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. या भागात 17 तारखेपर्यंत टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करुन येथील नागरिक ये-जा करणार नाहीत, यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत तपासणीसाठी आलेले एकूण सॅम्पल,  करण्यात आलेल्या सॅम्पल तपासणीची प्रयोगशाळानिहाय संख्या, प्रयोगशाळांना आवश्यक मनुष्यबळ व मशिनरी व साधनसामुग्री आदी विषयांबाबत बैठकीत चर्चा झाली.

यावेळी डॉ प्रिया अब्राहम, डॉ वर्षा पोतदार, बीजे मेडिकल कॉलेज चे लॅब प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते तसेच एनआयव्ही, नारी, एएफएमसी, सह्याद्री, मेट्रोपोलिटन, ए.जी. डायग्नोस्टिक व अन्य प्रयोगशाळा प्रमुखांनी आवश्यक सोयी सुविधा व उपाययोजनांबाबत सूचना केल्या.

बैठकीला कोविड-19 ची सॅम्पल तपासणी  करणाऱ्या शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांचे प्रमुख उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या जिल्हावासियांच्या विलगीकरणासाठी नियोजन सुरु

Next Post

भडगांव तहसिलदार सह महसुल व पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई

Next Post
भडगांव तहसिलदार सह महसुल व पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई

भडगांव तहसिलदार सह महसुल व पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo