Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या जिल्हावासियांच्या विलगीकरणासाठी नियोजन सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या जिल्हावासियांच्या विलगीकरणासाठी नियोजन सुरु
Maha Info Corona Website

सातारा दि. 11 (जिमाका) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील नागरिक विविध कारणांमुळे बाहेरच्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत. हे नागरिक जिल्ह्यात आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.

कोरोना संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार  पृथ्वीराज चव्हाण, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.

कोरोनाचा कराडमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे, ही प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, या आजारावर खात्रीशीर असे औषध नाही, सुरक्षित अंतर ठेवणे हाच  यावर उपाय आहे. सामजिक दायित्व म्हणून विविध संस्था अन्नधान्य वाटप करीत आहेत. शासनाने शिवभोजन केंद्राची व थाळींची संख्या वाढवली असून ही थाळी अवघ्या 5 रुपयांमध्ये गरजूंना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

मुंबई-पुण्याहून आलेल्या नागरिकांची संख्या प्रशासनाकडे आहे. पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना  विलगीकरण कसे करता येईल यासाठी जिल्हा प्रशासन काम करीत आहे. तसेच परराज्यातील नागरिकांची नोंदणी सुरु असून राज्यांनी होकार दिल्यानंतर रेल्वेही सोडण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

आपल्या जिल्ह्यातील लोक परराज्यात अडकलेले आहे, त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना करुन खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, लोकप्रनिधींना माहिती होण्यासाठी 24 तास कॉलसेंटर सुरु करा. कोरोना संदर्भात नगरसेवकांना, सरपंचांना, पोलीस पाटलांना विश्वासात घेऊन काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपापसात समन्वय ठेवावा. जे बाहेर जिल्ह्यातून नागरिक येणार आहेत त्यांचे  विलगीकरण करताना गावाला विश्वासात घेऊन करावे. तसेच जिल्ह्यात प्रवेश देताना अतिशय काटेकोरपणे नियमाची अंमलबजावणी व्हावी. जिल्ह्यातील मोठे हॉटेलही विलगीकरणासाठी उपलब्ध करुन द्यावेत, ज्यांची ऐपत असेल असे लोक तिथे राहतील अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.तसेच निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे यंत्रणा उभी केली जाते तशा प्रकारची यंत्रणा उभी केल्यास विलगीकरण केलेल्या नागरिकांवर सहजपणे लक्ष ठेवता येईल व त्यांना वेळेत उपचार केले जातील यासह अनेक सूचना यावेळी उपस्थित खासदारांसह आमदारांनी केल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केंद्रीय पथकाकडून पुण्याच्या ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

Next Post

सॅम्पल तपासणीची क्षमता वाढविण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

Next Post
सॅम्पल तपासणीची क्षमता वाढविण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

सॅम्पल तपासणीची क्षमता वाढविण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo