Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सेक्स–कवी व संकलन-अरुण सुमनबाई कवरसिंग चव्हाण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/06/2021
in लैंगिक शिक्षण
Reading Time: 1 min read
सेक्स–कवी व संकलन-अरुण सुमनबाई कवरसिंग चव्हाण

बोलणं अडखळल्यागत होतं;
अन् थांबतो:
होतो अंतर्मुख…

पुढचं नसतं बोलण्यासारखं:
अभद्र आहे, असं नाही-
कदाचित्, असू शकतं अप्रिय…

कबुली द्यायची असते;
पण होत नाही धाडस.
साशंक आहे, म्हणून म्हणत नाही.
प्रेम: हो, प्रेमाची कबुली…

ती करीत असावी, उत्कट;
कदाचित्, कुणी सांगावं, नसेलही तसं.
आम्ही मित्र आहोत:
एकमेकांस शेअर करणारे…

मग आजच असं का होतंय्?
एकत्र उठणं-बसणं, टाळ्या देणं;
अर्धा घास राखून ठेवतो:
उष्ट्यानंच पित राहतो-
पाणी-पेयादी…
बिनदिक्कत ओढणीला हात पुसतो.

बोलतो प्रेमावर मनमुराद:
(आताशा अडखळू लागलोय्.)
गरज आणि गरजेसंबंधी…
प्रेम: शरीरापलीकडं असतं काय?
की शरीर जमेत धरून केलं जातं:
समाजाकडून असलेल्या अपेक्षा…
का नाक मुरडतो?
निषिध्द मानतो…

ऐकून आहोत:
आख्यायिका अजोड कहाण्या…
विफल प्रेमाच्या!
करतो चर्चा: दुभंगतो…
कळत नाही-
प्रेमाला विरोध का?
प्रेम का ठरविलं ज़ातं प्रतिष्ठाहीन?

प्रेमात सेक्स अपरिहार्य असतो का?
कुठल्याच प्रेम-कहाणीत असा आढळ नाही.
प्रेमी बेभान होऊन काय करीत होते?

आम्ही होतो कुंठित.
मिळत नाही उत्तर: उत्तरोत्तर…
निरुत्तर.

आम्ही सेक्सशी येऊन थांबतो;
चाचपू लागतो, स्वत:ला…ते असावं काय अनिवार्य?

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खासदार संभाजीराजे छत्रपती यांना सामंजस्याची भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले मनोमन धन्यवाद

Next Post

वरणगाव मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करा यासाठी महिलांचे उपोषण सुरू-आंदोलन अधिक तिव्र करणार असल्याची आंदोलकांची भुमिका

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo