Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्क्वॅश चॅम्पियनशिप  2022 या स्पर्धेचे उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
स्क्वॅश चॅम्पियनशिप  2022 या स्पर्धेचे उद्घाटन

जळगाव दि.8- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप  2022 या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते पाच स्क्वॅश कोर्ट उद्घाटन करण्यात आले .त्यानंतर मशालीचे प्रज्वलन करण्यात आले.


कार्यक्रमात डॉ. प्रदीप खांड्रे, अध्यक्ष महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन ,डॉ. प्रदीप तळवेलकर, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जळगांव शहर महानगरपालिका आयुक्त  डॉ. विद्या गायकवाड, महापौर  जयश्री महाजन, प्रणिता झांबरे, मुख्याध्यापिका, ए. टी. झांबरे विद्यालय ,हर्षल चौधरी, अध्यक्ष, जळगांव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशन,दयानंद कुमार, सहसचिव, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना व सचिव, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन, शशिकांत वडोदकर, प्रशासकिय अधिकारी,ॲड.प्रमोद पाटील, डॉ. प्रदिप खांडे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, (सचिव, जळगांव जिल्हा हॉशी स्क्वैश असोसिएशन),डॉ. प्रदिप तळवेलकर, शिवछत्रपती पुरस्कारार्थी,डॉ. दिनेश पाटील, क्रीडा संचालक, क. ब. चौ.उ.म. विद्यापीठ, प्रा. निलेश जोशी, (आंतरराष्ट्रीय जिम्नेस्टिक्स प्रशिक्षक), रविंद्र चोथवे, सचिव, महाराष्ट्र राज्य फ्लोअरबॉल संघटना,डॉ. रणजित पाटील, सह-सचिव, जळगांव जिल्हा हौशी स्क्वैश असोसिएशन, उज्वला बेंडाळे, नगरसेविका, म.न.पा.प्रा.सं.ना.भारंबे, प्राचार्य अशोक राणे,संदीप जगताप उपस्थित होते.


8 मे ते 11 मे या कालावधीत एकलव्य क्रीडा संकुलचे स्क्वॅश कोर्ट, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर या ठिकाणी होणार आहेत.यात महाराष्ट्रातील 20 ते 25 जिल्ह्याचा सहभाग या स्पर्धेत असून प्रत्येक जिल्हा आणि वयोगटातुन जास्तीत जास्त 20 ते 25 खेळाडू सहभागी झाले आहेत .  स्पर्धेकरिता एकूण 12 पंच अधिकारी व 4 ते 5 संघटना पदाधिकारी आहेत . सदर स्पर्धा या जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असून या स्पर्धेत महाराष्ट्रातून ५००पेक्षा जास्त  खेळाडू सहभागी होणार आहेत.खान्देशातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात गेल्या 05 वर्षात ऑलम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, 05 वूडन बेटमिटंन कोर्टस आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 10 मी. शूटिंग रेंजनंतर आता भव्य व अद्ययावत अशा 05 स्क्वॅश कोर्टसची उभारणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले तर अध्यक्षीय मनोगत केसीई सोसायटी कोषाध्यक्ष डी टी पाटील यांनी व्यक्त केले.आभार डाॅ.रणजित पाटील व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाबराव पाटील यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

निधन वार्ता-लालचंद परशुराम नेमाडे

Next Post

तळपत्या उन्हात इनरव्हील क्लब न्यू जेनने दिली हॉकर्सला छाया!

Next Post
तळपत्या उन्हात इनरव्हील क्लब न्यू जेनने दिली हॉकर्सला छाया!

तळपत्या उन्हात इनरव्हील क्लब न्यू जेनने दिली हॉकर्सला छाया!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d