Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हंगामी पिकासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
हंगामी पिकासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव वृत्त दिनांक २६:- धुळे व नंदुरबार जिल्हयातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजुर उपसा सिंचन योजना यांच पाण्याचा फायदा घेणारे तमाम बागायतदांना आवाहन येते की, दि.०१/०७/२०२४ ते १४/१०/२०२४ या कालावध करीता दि.०१/०७/२०२४ पासून सुरु होणारा खरीप हंगाम २०२४ मध्ये भुसार/अन्नधान्य/चारा/डाळी/कपाशी/भुईमुग इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करावे.

पाणी अर्ज स्विकारण्याकरिता पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदारानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवुन नंतरच मंजुरी / ना मंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठयाबाबत अन्नधान्ये/भुसार/चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाले शिवाय पाणी घेऊ नये. धकबाकीदारांनी मागील संपुर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा १०% जादा आकारासह कृपया भरणे आवश्यक आहे. पाणीनाश/पाळी नसतांना पाणी घेणे/मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजवणे/विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे/व पाटमोट संबंध दुर न करणे वगैरे गुन्हे करणाऱ्या बागायतदारांनी नियमानुसार पंचनामे करणेत येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.
टंचाई परिस्थीतीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पिक नुकसान भरपाई देता येणार नाही. जाहिर निवेदनामध्ये नमुद केलेल्या विहीत दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यानंतर जाहिर प्रकटनाद्वारे प्रसिध्दी करण्यात येईल. लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासुन ३५ मीटर अंतराच्या हद्दीतील विहीरीबाबत नमुना७ (ब) मागणी अर्ज न करता बिन अर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल.

तरीबागायतदारांनी आपले नमुना नं.७, ७ (अ), ७ (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंव उपविभागीय कार्यालयात दिनांक ३१/०८/२०२४ पर्यंत सायंकाळी १७-४५ वाजेपर्यंत द्यावे असे आवाहन कार्यकारी अभियंता एन एम व्हट्टे पाटबंधारे विभाग धुळे यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

Next Post

जळगांव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दि.27 जुलै रोजी तडजोडपत्र प्रलंबित खटले मिळविण्यास सुवर्णसंधी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo