Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हसत खेळत शिक्षणासाठी एड्युफेअर- आयुक्त डॉ. उदय टेकाळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

अनुभूती स्कुलच्या ‘एड्युफेअर 2019’ चे कागदी विमान उडवून अनोखे उद्घाटन

वैज्ञानिक खेळ खेळताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन  शेजारी दलिचंदजी जैन, डॉ. शेखर रायसोनी, सौ. ज्योती जैन, डॉ. सुभाष चौधरी

जळगाव दि.२० (प्रतिनिधी) –  दैनंदिन जीवनात विज्ञानाचा उपयोग आणि हसत खेळत शिक्षण या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ‘एड्युफेअर-२०१९’ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी व्यक्त केला. त्यांच्यासह जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्यात. दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे इंग्रजी माध्यमातून मोफत मिळावे हे भवरलालजी जैन यांचे व्हिजन होते. विज्ञानासोबतचे शिक्षण त्यांच्या भावी उत्कर्षाचा केंद्रबिंदू ठरत आहे. असे सांगत शिक्षणासोबतच आनंद घ्या, या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अबालवृद्धांनी एड्युफेअरला भेट द्यावी असे यावेळी ते म्हणाले. अनुभूती इंग्लिश मिडियम स्कुल प्रायमरी व सेकंडरी च्या विद्यार्थ्यांनी साकारलेला ‘एड्युफेअर-2019’ चे खान्देश सेंट्रल मॉलच्या भव्य लॉनवर आकर्षक, रंगीत कागदी विमाने उडवून मान्यवरांच्याहस्ते औपचारीक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, सेवादास दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. शेखर रायसोनी, बांधकाम व्यावसायीक अनिश शहा, आनंद गुप्ते, सौ. ज्योती जैन, अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेन्सीयल स्कुलचे प्राचार्य जे. पी. राव, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रायमरी व सेकंडरीच्या प्राचार्या रश्मी लाहोटी उपस्थित होते.

एड्युफेअरमध्ये मान्यवर रमले

कुतूहल क्षमता वाढवणारे, वैज्ञानिक-गणितीयदृष्टीने संशोधक निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अनुभूती स्कुलतर्फे दर दोन वर्षानंतर एड्युफेअर या शैक्षणिक जत्रेचे आयोजन केले जाते. या जत्रेत विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले विविध वैज्ञानिक, बौद्धीक खेळ ठेवण्यात आलेले आहेत. या विविध खेळांचा समावेश असलेल्या स्टॉल्समध्ये सर्व मान्यवर आपले बालपण आठवून त्यात रमले. प्रत्येक स्टॉलची माहिती त्यांनी जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी आपल्या स्टॉलचे उत्कृष्ट संभाषणाद्वारे माहिती दिली.

एड्युफेअर ला भेट देण्याचे आवाहन

गेल्या दोन वर्षांपासून शहरातील सर्व शाळांना, पालकांना देखील ही यात्रा अनुभवता यावी यासाठी या एड्युफेअरला व्यापक स्वरूप देण्यात आलेले आहे. यावर्षी विद्यार्थी व पालकांच्या आग्रहाखातर खान्देश सेंट्रल मॉलच्या भव्य अशा हिरवळीवर हा कार्यक्रम होत आहे. दि. २२ डिसेंबर पर्यंत दुपारी ३ ते रात्री ९ वाजेदरम्यान एड्युफेअर ला भेट देता येईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अमेरिकेत मराठी भाषा जपणारी माणसं

Next Post

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo