Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खंडणीप्रकरणी सरपंचाची दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अपीलात जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये रद्द

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

वाकडी, ता. चाळीसगाव येथील विद्यमान सरपंच प्रकाश यशवंत पाटील यांनी व ईतर दोन जणांनी सावदा, ता. रावेर येथील हाजी ईमदाद अली अख्तर हुसेन या पेट्रोल पंपांचे मालक शब्बीर हुसेन अख्तर हुसेन उर्फ बाबुशेठ यांना, “आम्ही बॉम्बे व्हिजीलन्स स्क्वॉडचे अधिकारी असुन मुंबई येथून आलेलो आहोत, तुम्ही पेट्रोल व डिझेल मध्ये रॉकेल भेसळ करतात, अशी तुमच्याविरुद्ध मंत्रालयापर्यंत तक्रार आहे, तुमचा पेट्रोल पंप सील करावा लागेल,” अशा धमक्या देउन दि.०५-११-२००८ पुर्वीच्या एक वर्षाच्या कालावधीत वेळोवेळी रु.१,१५,०००/- खंडणीची रक्कम वसुल केली. शेवटी दि.०५-११-२००८ रोजी या तिघां आरोपींना फिर्यादी शब्बीर हुसेन अख्तर हुसेन यांनी सावदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मदतीने सापळा रचून सावदा येथील त्यांचे पेट्रोलपंपाच्या कॅबिनमध्ये रु.५०,०००/- खंडणीची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले, त्यावेळी पोलिसांनी आरोपींकडून पेट्रोल पंपांचे लेबल असलेले रोख रु.५०,०००/-चे बंडल, दोन‌ मोबाईल, डायरी असा ऐवज हस्तगत केला, अशी फिर्याद शब्बीर हुसेन अख्तर हुसेन यांनी दि.०५-११-२००८ रोजी सावदा पोलिस स्टेशन, ता. रावेर येथे दाखल केली. त्यानुसार सावदा पोलिस स्टेशनला आरोपी प्रकाश यशवंत पाटील व ईतर दोघांविरुद्ध गु. र. नं.९१/२००८ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

सदर खटला चौकशीवेळी रावेर न्यायालयात सरकारपक्षातर्फे फिर्यादी शब्बीर हुसेन अख्तर हुसेन, घटनास्थळ व जप्ती पंच अफजलखान, पेट्रोल पंपाचा मॅनेजर सतीश जोशी आणी तपासाधिकारी सपोनि निलेश माईनकर यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्यात. चौकशीअंती रावेर न्यायालयाने आरोपी प्रकाश यशवंत पाटील यांना दोन वर्षे सक्तमजुरी रुपये आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. ईतर दोन्ही आरोपींना रावेर न्यायालयाने निर्दोष सोडले होते.

सदर शिक्षेच्या निकालाविरोधात व्यथित होऊन अपेलंट प्रकाश यशवंत पाटील यांनी भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी अपील क्र.६६/२०१६ दाखल केले होते. आरोपीतर्फे व सरकार पक्षातर्फे अशा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एम. जाधव यांनी आरोपी प्रकाश यशवंत पाटील यांची, रावेर कोर्टाने दिलेली दोन वर्षाच्या सक्तमजुरी व रु.१००००/- दंड ही शिक्षा रद्द करून आरोपी/अपेलंट प्रकाश यशवंत पाटील यांस सदर गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले.

आरोपी/अपेलंटतर्फे जळगाव येथील ॲड. निरंजन वसंत ढाके यांनी आरोपीची बाजू मांडली. सरकारपक्षातर्फे ॲड. भोंबे आणि फिर्यादीतर्फे ॲड. जगदीश कापडे यांनी काम पाहिले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रफुल्ल क्लासेस वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

युवारंग सुकानु समितीची आज आढावा बैठक संपन्न

Next Post
युवारंग सुकानु समितीची आज आढावा बैठक संपन्न

युवारंग सुकानु समितीची आज आढावा बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d