Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

Desk Team by Desk Team
06/08/2026
in विशेष
गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

जळगाव, दि.6 (प्रतिनिधी) : हिरोशिमा दिनानिमित्त जळगाव येथील गांधी उद्यान येथे गुरुवारी ६ रोजी गांधी रिसर्च फाउंडेशन व हरिजन सेवक संघाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वधर्म प्रार्थना करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा व नागासाकीवर झालेल्या अणुबाँब हल्ल्याच्या स्मृतींना अभिवादन करत जगात शांतता, बंधुता आणि अहिंसेचा संदेश दृढ व्हावा, तसेच अशा विनाशकारी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, असा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरकुमार सन्याल, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेश यादव, राष्ट्रीय सचिव संजय राय, रामकुमार मंडल, निशा त्यागी यांच्यासह गांधी तीर्थचे उदय महाजन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्य आणि विश्वशांतीच्या विचारांचे स्मरण करून समाजात सलोखा व सद्भावना वाढविण्याचे आवाहन केले.

दरम्यान, गांधी तीर्थ येथे हरिजन सेवक संघाचे ७ ऑगस्ट पासून तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू होत असून, देशाच्या विविध राज्यांतील तसेच परदेशातून आलेले सुमारे शंभर प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होत आहेत. विविध गांधीवादी, समाजसेवक, विचारवंत आणि कार्यकर्ते यावेळी गांधी विचार, सामाजिक समरसता, बंधुता, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर चर्चा करून आगामी काळातील कार्याची दिशा निश्चित करणार आहेत.

या अधिवेशनाला संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरकुमार सन्याल, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेश यादव, राष्ट्रीय सचिव संजय राय, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सचिव मधुकर शिरसाठ, राजीव देशपांडे, जळगाव जिल्हा हरिजन सेवक संघाचे शंभू पाटील तसेच संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून, विविध विषयांवरील मार्गदर्शन सत्रे, संवाद आणि विचारमंथनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Desk Team

Previous Post

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo