Sunday, May 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

पाचोरा एसकेटी योद्धाज, चाळीगाव एसपीसीसी चॅलेंजर, सातपुडा हिरोज विजयी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2026
in क्रीडा, जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव -(प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 चा रोमांच सुरू आहे. कांताईनगर येथील जैन ड्रिम स्पेसेसच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत सोमवारी चाळीसगाव एसएसपी चॅलेंजर आणि पाचोरा एसकेटी योद्धाज हा संघ विजेता ठरला. तत्पूर्वी रविवारी रात्री झालेल्या सामन्यात सातपुडा हिरोज् विजेता ठरला.

सलग दोन सामन्यात विजयी ठरलेला जळगाव कोकटा किंग्स संघाने सोमवारी तिसऱ्या सामन्यात नाफेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. या संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १७५ धावा केल्या.

सलामीवीर ओम भोसले याच्याकडून सलग तिसऱ्या शतकाची अपेक्षा होती. मात्र तो केवळ १८ धावांवर बाद झाला. माजी रणजीपटू सचिन चौधरी त्याला बाद केले. त्यानंतर जितेंद्र, अक्षय आणि विपिन हे खेळाडू देखील लवकर बाद झाल्याने कोकटा किंग्सची अवस्था ५ बाद ६९ अशी झाली होती. मात्र पूर्वेश चौधरी आणि मनीष चव्हाण या अष्टपैलू खेळाडूंनी ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी करत संघाला सावरले. मनीष चव्हाण याने ३५ चेंडूत नाबाद ५८ धावांची झंझावाती खेळी केली. गोलंदाजीत सचिन चौधरी याने २ बळी घेतले, तर यश अग्रवाल याने ४ षटकांत केवळ १९ धावा देत प्रभावी खेळी केली. पाचोरा एसकेटी योद्धाज संघ १७६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला. या संघाने जोरदार सुरुवात केली. या संघातील कैलास पाटील याने ४९ चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तोच सामनावीर ठरला. त्याला सिद्धेश देशमुख याने ४१ चेंडूत ५१ धावा करत चांगली साथ दिली. या सामन्यात शेवटच्या षटकांत सहा धावांची गरज होती. त्यामुळे रोमांच निर्माण झाला होता. परंतु पहिल्या चेंडूवर चौकार मारत पाचोरा संघाने विजयाचा मार्ग सुकर केला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूत दोन धावा करत सात गडी राखत विजय मिळवला. जळगाव कोकटा किंग्स संघाचा हा पहिलाच पराभव आहे.

अमेय कोळीच्या खेळीने चाळीसगाव संघ विजयी

जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर यांच्यातील सामन्यात सकाळच्या सत्रात जामनेर संघाने 20 षटकांत 7 बाद 158 धावा केल्या. सुरुवातीलाच प्रद्युमन महाजन, ललित पाटील आणि मानस हे स्वस्तात बाद झाल्याने जामनेर अडचणीत सापडला होता. मात्र त्यानंतर रवींद्र याने केवळ 40 चेंडूंमध्ये 68 धावांची दमदार खेळी करत डाव सावरला. तसेच क्रिश नाथानी याने 25 चेंडूत 35 धावा करत त्याला साथ दिली. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरकडून वकार शेख याने शेवटच्या षटकात 2 बळी घेतले. ओम मुंडे याने 4 षटकांत 29 धावा देत 2 गडी बाद केले. जामनेर संघाला 158 धावांवर रोखण्यात चाळीसगावला यश आले. त्यानंतर चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर संघ मैदानात उतरला. ओम मुंडे पहिल्या षटकातच तंबूत परतला. सामनावीर ठरलेला अमेय कोळी याने ४९ चेंडूत ६६ धावा काढल्या. त्याच्या सोबतीला साहिल गायकरने चांगली साथ देत ३७ चेंडूत (१ षटकार व ३ चौकार) ४६ धावा काढल्या. गोलंदाजीत शतायू कुळकर्णी २ रामकृष्ण राठोड १ गडी बाद केले. शेवटी १९.३ षटकात ६ गडी बाद होऊन १६२ धावा करत विजयाची मोहर नोंदविली. यापूर्वी सलग दोन सामने जिंकणाऱ्या जामनेर संघाला हॅटट्रीक पासून दूर ठेवलं.

सातपुडा हिरोजचा दमदार विजय; 68 धावांनी रावेर पराभूत
दरम्यान काल दि १९ रोजी रात्री रावेर रॉयल्स आणि सातपुडा हिरोज् यांच्यात सामना झाला. त्यात सातपुडा हिरोज् हा संघ ६८ धावांनी विजयी झाला. या सामन्याची नाणेफेक विनीत जोशी यांच्या हस्ते झाली. रावेर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. जामनेर सातपुडा हिरोज संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 182 धावांचा भक्कम डोंगर उभारला. सातपुडाकडून मितालेश चौधरीने शानदार फलंदाजी करत 46 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. प्रद्युम्न महाजनने 29 चेंडूत 43 धावा तर योगेश तेलंगने 16 चेंडूत 31 धावा करत डावाला वेग दिला. रावेरकडून आमिर खानने 4 षटकांत 29 धावा देत 3 बळी घेतले, तर संजय सुरवाडेने 2 बळी मिळवले.
प्रत्युत्तरात रावेर संघ 20 षटकांत 9 बाद 114 धावांपर्यंतच मजल मारू शकला. अनुज पवार (20) व यश नहार (18) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. गोलंदाजीत शतायू कुलकर्णी, रामकृष्ण राठोड आणि ललित पाटील यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. सातपुडा हिरोजने हा सामना 68 धावांनी जिंकला. नाबाद 70 धावांसाठी मितलेश चौधरीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

काव्यरत्नावली चौक, नेहरू चौकात मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण

जेसीएल सामान्यांचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर बघण्याची व्यवस्था करण्यात जळगाव शहरात करण्यात आलेली आहे. काव्यरत्नावली चौक आणि नेहरू चौक येथेही व्यवस्था केली आहे. त्याठिकाणी सामान्यांचा लाभ असंख्य प्रेक्षक घेत आहेत, असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले.

आजचे सामने (२१ एप्रिल)
सकाळी ८.३० : जळगाव कोगटा किंग X रावेर रॉयल्स.
दुपारी ३ : जामनेर सातपुडा हिरोज X अमळनेर सुहांस जायंट्स.
सायंकाळी ७.३० : पाचोरा एसकेटी योद्धाज X चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

Next Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

Next Post
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

Leave a ReplyCancel reply

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल 89.01 % यशाची परंपरा कायम!!!

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा!;प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d