लोहारा या.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले समर्पित कार्य आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अध्यापन कार्याची दखल घेत सन्माननीय शिक्षक श्री. सुभाष यादव सरोदे सर यांना प्रतिष्ठेच्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात आले.

सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., मुंबई यांच्या वतीने दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी परेल, मुंबई येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

प्रसिद्ध कवी, गझलकार आणि साहित्यिक सन्माननीय श्री. अनंत राऊत यांच्या शुभहस्ते श्री. सुभाष यादव सरोदे सर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोसायटीचे सन्माननीय पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.

मानपत्र, आकर्षक स्मृतिचिन्ह आणि सन्मानचिन्ह देऊन सरोदे सरांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कारामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याला एक नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली असून शिक्षक म्हणून केलेल्या योगदानाचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शिक्षकाचा सन्मान म्हणजे ज्ञानसंस्कृतीचा सन्मान!

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनवले. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. सुभाष यादव सरोदे सर यांनी सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या सन्मानामुळे भविष्यातही अधिक समर्पणाने शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

“शिक्षकाच्या हातातील खडू केवळ अक्षरे गिरवत नाही, तर तो असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देत असतो. पुरस्कार हा कार्याचा गौरव असतो; मात्र विद्यार्थ्यांच्या यशात दिसणारे शिक्षकाचे प्रतिबिंब हाच त्याचा खरा जीवनगौरव असतो!”

श्री. सुभाष यादव सरोदे सर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.








