Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय आंतर शालेय 14 व 17 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज बॕडमिंटन स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव दि. 25 प्रतिनिधी – जैन स्पोर्टस ॲकडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे प्रायोजित जिल्हास्तरीय आंतर शालेय 14 व 17 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज बॕडमिंटन स्पर्धा-2022’ अनुभूती निवासी स्कूल येथे संपन्न झाली. दि. 24 ते 25 या दोन दिवसीय झालेल्या स्पर्धेचा समारोप आज झाला. या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव विजयी ठरले. तर उपविजयी सेंट टेरेसा काॕ. इंग्लिश मिडीअम स्कूल, जळगाव ठरले. तसेच मुलांमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, चाळीसगाव विजयी ठरले. तर उपविजयी काकासाहेब पुर्णपात्रे माध्यमिक विद्यालय चाळीसगाव ठरले. स्पर्धेच्या 17 वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव विजयी ठरले. तर उपविजयी सेंट टेरेसा काॕ. इंग्लिश मिडीअम स्कूल, जळगाव ठरले. तसेच मुलांमध्ये सेंट टेरेसा काॕ. इंग्लिश मिडीअम स्कूल, जळगाव विजयी तर
सेंट जोसेफ काॕ. इंग्लिश मिडिअम स्कूल जळगाव उपविजयी झाले.


स्पर्धेच्या सर्वाकृष्ट खेळाडू म्हणून 14 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये सोम्या लोखंडे, मुलांमध्ये जयवंत पवार तर 17 वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये सत्ताक्षी वाणी तर मुलांमध्ये ऊजेर देशपांडे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
जिल्ह्यातील 35 शाळांमधून 92 संघ सहभागी झाले होते. त्यात 550 खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले. विजयी व उपविजयी शालेय संघातील स्पर्धेकांना चषक, पदक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास, जैन स्पोर्टस ॲकडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह यांच्याहस्ते पारितोषिक वितरण झाले.


जळगाव जिल्हा बॕडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, जैन स्पोर्टस ॲकडमीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अरिवंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रविंद्र धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. जैन चॕलेंज बॕडमिंटन स्पर्धेत मुख्य पंच किशोर सिंह, सहपंच जाझीब शेख, रौनक चांडक, गीता पंडीत, मिहिर कुलकर्णी, अर्ष शेख, करण पाटील, व्रजनाभ कोल्हे, सुफियाॕन शेख, धिर वेद, शुभम चांदसरकर, ऊजेर देशपांडे, देव वेद, ऋवेदा काबरा, सौम्या लोखंडे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी प्रविण ठाकरे, समिर शेख, सोमदत्त तिवारी, विकास बारी यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज कॕरम स्पर्धा-2022’

Next Post

यावल वनविभागाची मोठी कारवाई;मौल्यवान साग केला जप्त

Next Post

यावल वनविभागाची मोठी कारवाई;मौल्यवान साग केला जप्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo