Friday, July 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/05/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जैन इरिगेशन क्रिकेट क्लबच्या ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघ (डावीकडून) प्रशिक्षक समद फल्ला, अमित गवांदे, यश नहार, वरूण देशपांडे, मयंक पारेख सर, शशांक अत्तरदे, सुवेद पारकर, सुरज शिंदे, प्रशिक्षक अनंत तांबवेकर,
व मागील रांगेत आदित्य राजन, प्रतिक यादव, शुभम शर्मा, जगदीश झोपे, सोहम पानवलकर, जय जैन, झैनीत सचदेव, कौशल तांबे, अर्थव पुजारी, रिषभ कारवा, वैभव चौगूले

जळगाव दि.२४ प्रतिनिधी – जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर २१ धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले.
कांदिवली येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीचा सामना जैन इरिगेशन विरूद्ध ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब यांच्यात रंगला. या सामन्यात जैन इरिगेशनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १६५ धावा केल्या. त्यात १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील डावखुरा खेडाळू कौशल तांबे याने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. विजयासाठी १६६ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब ला २० षटकांत ९ बाद १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. जैन इरिगेशनचा फिरकीपटू शुभम शर्मा, शशांक अत्तरदे आणि जगदीश झोपे यांनी अचूक मारा करत विजय सुकर केला.

जैन इरिगेशन क्रिकेट क्लबच्या ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघात प्रशिक्षक समद फल्ला, अमित गवांदे, यश नहार, वरूण देशपांडे, मयंक पारेख सर, शशांक अत्तरदे, सुवेद पारकर, सुरज शिंदे, प्रशिक्षक अनंत तांबवेकर, आदित्य राजन, प्रतिक यादव, शुभम शर्मा, जगदीश झोपे, सोहम पानवलकर, जय जैन, झैनीत सचदेव, कौशल तांबे, अर्थव पुजारी, रिषभ कारवा, वैभव चौगूले यांचा समावेश होता.

संक्षिप्त धावफलक जैन इरिगेशन सीसी : २० षटकांत ८ बाद १६५, त्यामध्ये कौशल तांबे (२७ चेंडूंत ४४ धावा, २ चौकार, २ षटकार), सुवेद पारकर (२४ चेंडूत ३७ धावा, ५ चौकार), जय जैन २४; संतोष चव्हाण ३/२४, आदित्य राणे ३/२९) विजयी विरूद्ध ऑटोमोटिव्ह सीसी : २० षटकांत ९ बाद १४४. त्यामध्ये आदित्य शेमाडकर (२४ चेंडूंत ३७ धावा ६ चौकार, मनेश भोगले (२१ चेंडूत नाबाद ३२, चौकार १, षटकार २, सुशांत वाजे (१९ चेंडूत २७ धावा, २ चौकार, २ षटकार); शुभम शर्मा ३/१६, जगदीश झोपे २/२२, शशांक अत्तरदे २/२४).

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता

Next Post

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा ता. पाचोरा शालेय १२वी परीक्षेत घवघवीत यश

Next Post
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा ता. पाचोरा शालेय १२वी परीक्षेत घवघवीत यश

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा ता. पाचोरा शालेय १२वी परीक्षेत घवघवीत यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo