Wednesday, May 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नातेवाईक मिळेना ; धुळ्याच्या वृद्धाश्रमाचा मदतीचा हात;”शावैम” मधील रुग्णास मिळाला दिलासा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
नातेवाईक मिळेना ; धुळ्याच्या वृद्धाश्रमाचा मदतीचा हात;”शावैम” मधील रुग्णास मिळाला दिलासा

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे बेवारस असलेल्या व्यक्तीस उपचारानंतर आधार देण्यासाठी धुळे येथील सावली वृद्धाश्रमाने पुढाकार घेतला. त्यामुळे एका निराधारास हक्काचा निवारा व काळजी घेणारी माणसे मिळाली. प्रसंगी संस्थेच्या प्रमुखांनी अधिष्ठात्यांची भेट घेत रुग्णाचा ताबा घेऊन धुळ्याकडे रवाना झाले.

हिरामण रघुनाथ पाटील (वय ५०) या व्यक्तीस शारिरीक अशक्तपणा, चेहऱ्यावर, डाव्या डोळ्यांच्या खोबणीत तसेच शरीरात इन्फेक्शन व त्वचारोग झालेला होता. त्याचे कोणीही नातेवाईक नव्हते. परिणामी त्यांची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न होता. धुळे येथील रहिवासी असल्याचे ते सांगतात. या रुग्णाला प्राथमिक स्तरावर उपचार करून प्रकृती स्थिर झाल्यावर धुळे येथील श्रमिक बहुद्देशीय सेवाभावी संस्था, धुळे संचलित सावली वृद्धाश्रमचे अध्यक्ष आप्पा खताळ यांनी जबाबदारी घेण्याचे कळविले. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील समाजसेवी अधीक्षक संदीप बागुल यांनी समन्वय साधला.

त्यानुसार आप्पा खताळ यांनी वाहनातून धुळे येथे हिरामण पाटील यांना सुश्रुषा व पुनर्वसनकरीता घेऊन घेले. तसेच, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झंवर यांनी वाहनाचा खर्च दिला. त्याआधी आप्पा खताळ यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. प्रसंगी आप्पा खताळ यांच्या वृद्धाश्रम संदर्भात असलेल्या कामगिरीचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी कौतुक केले. एका निराधार व्यक्तीस मानसिक व शारीरिक आधार देणे हि मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

रुग्णावर उपचार करण्याकामी नेत्रशल्यचिकित्सा शास्त विभाग प्रमुख डॉ. प्रसन्न पाटील, औषधवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, डॉ. प्रसाद खैरनार, डॉ. उमेश जाधव यांच्यासह परिचारिका, कक्षसेवकांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

खान्देशी लोककलेला राजमान्यता मिळावी-विनोद ढगे

Next Post

वावडदा येथे रक्तदान शिबीर संपन्न

Next Post
वावडदा येथे रक्तदान शिबीर संपन्न

वावडदा येथे रक्तदान शिबीर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा!;प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d