Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मतदारसंघाच्या विकासासाठी आ. राजूमामांनी नेहमीच पुढाकार घेतला : विशाल त्रिपाठी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
मतदारसंघाच्या विकासासाठी आ. राजूमामांनी नेहमीच पुढाकार घेतला : विशाल त्रिपाठी

राजर्षी शाहूनगर, जयकिसनवाडी, नवीपेठ भागात रॅलीला भरभरून प्रतिसाद

जळगाव – (प्रतिनिधी) – शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी गेल्या १० वर्षाच्या काळात नेहमी मतदारसंघाच्या विकासासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी मंजूर करून आणला. त्यामुळे अनेक बदल घडून आले. त्यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी यांनी प्रचार रॅलीदरम्यान संवाद साधताना केले. जळगाव शहरात आ. राजूमामा भोळे यांनी राजर्षी शाहूनगर, जयकिसनवाडी, नवीपेठ भागात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात रॅली काढली. प्रसंगी जनतेतून भरभरून प्रतिसाद लाभला.

राजर्षी शाहू नगर येथील तपस्वी हनुमान मंदिर येथे पूजा करून आ. भोळे यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तेथून शाहू नगर परिसर, कोर्ट चौक मार्गे जयकिसनवाडी, नेहरू चौक, व. वा. वाचनालयमार्गे जिल्हा परिषद परिसरातून चित्रा चौक, नवी पेठेतील कंवरलाल संघवी यांचे घरी समारोप करण्यात आला. मार्गात अनेक तरुणींनी लोकप्रिय उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, रॅलीच्या रस्त्यावर डॉ. आरती हुजुरबाजार, नेहरू चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, दिलीप गांधी, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या घरी भेटी दिल्या.

रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फिरोज शेख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, भाजप अल्पसंख्याक महानगराध्यक्ष अशफाक खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे मंडळ अध्यक्ष मनोज काळे, विजय वाडकर, राजू खेडकर, प्रीतम पवार, अजय गांधी, जगदीश जोशी, किशोर देशमुख, प्रमोद वाणी, अमित देशपांडे, महेंद्र गांधी, अजय जैन, रेखा कुलकर्णी, कल्पेश सोनवणे, शिवसेनेचे राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, शंतनू नारखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, कौसर काकर, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, नाना भालेराव, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“वासुदेव आला रे, वासुदेव आला !गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !”

Next Post

जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

Next Post
जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo