Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यपालांच्या मान्यतेनंतर अध्यादेश काढण्यात येणार- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. ४ – राज्यातील मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भात ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून राज्यपालांकडे तशी शिफारस करण्यात येत आहे, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्यात एप्रिल, मे आणि जूनमध्ये १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या काळात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे आवश्यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज, प्रचारसभा, मेळावे आदींचे आयोजन केले जाते. लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. यातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तथापि, आता या ग्रामपंचायतींची मुदत संपली असून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही कमी झालेला नाही. त्यामुळे लगतच्या काळात निवडणुका घेणे शक्य नाहीत. तसेच ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी ५ वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींवर शासनामार्फत प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. राज्यपालांच्या मान्यतेनंतर यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येईल, असे ते म्हणाले. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) मध्ये कलम १५१ (३) नंतर पुढीलप्रमाणे बदल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. जर कोणत्याही कारणांमुळे (नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, युद्ध, वित्तीय आणीबाणी किंवा प्रशासकीय अडचणी इत्यादी मुळे) मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमानुसार ग्रामपंचायत निवडणूक घेता आली नाही तर त्यावेळेस शासनास या ग्रामपंचायतीवर उचित व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा अधिकार राहील.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना संकटावर आता एकच उत्तर “ब्रम्हास्त्र” -किशोरसिंग सोलंकी

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo