Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस;वेधशाळेने वर्तवली शक्यता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस;वेधशाळेने वर्तवली शक्यता

पुणे-(प्रतिनीधी) – पुण्यासह राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बुधवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. राज्यात 27 ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई वेधशाळेने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असेल. त्यामुळे गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार, अशी चिन्हे आहेत.

नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वार्‍यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार पर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठ वाड्यात लांबलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेली मका, बाजरी, ज्वारी, कपाशी पीक पूर्णपणे नष्ट झाले. या पावसाचा द्राक्ष बागांना देखील मोठा फटका बसलाला मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात कापणी केलेले भातपीक पुरते वाया गेले आहे.

राज्यात पावसाचा कहर सुरूच

राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे. या पावसामुळे हाती आलेली बाजरी, ज्वारी, मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव मध्ये मुसळधार पावसामुळे 40 टक्क्यांहून अधिक मका, बाजरी, ज्वारी पीक खराब झाले आहे. सोयाबीन पीक शेतात सडू लागली आहेत. येत्या 24 तासांत राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुष्काळी बीड, लातूर आणि उस्मानाबाद मध्ये पाऊस पडत आहे. पण हाती आलेले पीक वाया गेले आहे. परभणीत सलग तिसर्‍या दिवशी मुसळधार पाऊस पडत असून कापूस, मका पिकाचे नुकसान झाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दिवाळीनिमित्त गरजू महिलांना साड्या व फराळ भेट

Next Post

फटाकेमुक्त दिवाळीचे आदर्श शिक्षकाकडून आवाहन

Next Post

फटाकेमुक्त दिवाळीचे आदर्श शिक्षकाकडून आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo