Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रायसोनी महाविध्यालयात येत्या गुरुवारी व शुक्रवारी महारोजगार मेळावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
रायसोनी महाविध्यालयात येत्या गुरुवारी व शुक्रवारी महारोजगार मेळावा

२० कंपन्यांतील ७०० वर पदांसाठी होणार मुलाखती

जळगाव : रायसोनी इस्टीट्यूटच्या जॉब प्लेसमेंट मार्गदर्शन केंद्राच्या पुढाकाराने ता. ६ व ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविध्यालयात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १५ च्या वर विविध कंपन्या त्यांच्याकडील रिक्त सातशेवर जागांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती या मेळाव्यात घेणार असून, यातून अंतिम निवड केली जाणार आहे.

रायसोनी इस्टीट्यूटच्या जॉब प्लेसमेंट मार्गदर्शन केंद्राद्वारे नियमितपणे येथे रोजगार मेळावे घेतले जातात. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळावी तसेच औद्योगिक कंपन्यांना आवश्यक असलेले कर्मचारी उपलब्ध होण्यासाठी या केंद्राद्वारे दुवा म्हणून काम करताना रोजगार मेळावे घेतले जातात. यात सुशिक्षित बेरोजगार व कंपन्यांच्या व्यवस्थापनाला व्यासपीठ देऊन दोन्ही घटकांना एकमेकांच्या निवडीची संधी दिली जात असते. येत्या शुक्रवारी होणाऱ्या निशुल्क मेळाव्यात लक्ष्मी अॅग्नी कॉम्प्नेट प्रा. ली., स्काय टेक प्रा. ली., टेक महिंद्रा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स, पार्किन्स इंडिया प्रा. ली., देवगिरी फॉरेन प्रा. ली., जस्ट डायल लिमिटेड, ओरंगाबाद ऑटो, संजीव ऑटो पार्ट, इक्लेक्स या व आदी कंपन्‍या व संस्थांमधील विविध ७०० च्या वर रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पदवीधर, पदव्युत्तर, तंत्रनिकेतन, सर्विस इंडस्ट्री, टेक्निकल यातील कुठल्याही शाखेतील असलेल्या उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रायसोनी महाविध्यालय परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजता नाव नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर मुलाखती घेतल्या जातील. कंपन्यातील रिक्त पदांची माहिती  https:/bit.ly/2TsHWID या वेबसाइटवर उपलब्ध असून या लिंकवरच  ऑनलाइन नाव नोंदणी करुन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी तेजस कुंभारे, नैना जुनानकर यांच्या दूरध्‍वनी क्रमांक- ९९७५७७६८४४, ७७७४००९४८४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्लेसमेंट ऑफिसर तन्मय भाले, पंकज पाटील, हर्षद पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

म.अं.नि.स. जळगाव शहर शाखा कार्याध्यक्षपदी जितेंद्र बाबूलाल धनगर व शहर कार्यवाह म्हणून कल्पना शिरीष चौधरी यांची निवड

Next Post

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात गुरुवारी “फॅमिली बिजनेस समिट”

Next Post
रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात गुरुवारी “फॅमिली बिजनेस समिट”

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात गुरुवारी “फॅमिली बिजनेस समिट”

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d