Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/03/2026
in जळगाव, माहितीचा अधिकार २००५, राज्य, शैक्षणिक, सामाजिक
Reading Time: 1 min read
समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मासवे) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ आणि ९ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषदेचा विषय “सामाजिक कायदे : शाश्वत आणि समावेशी विकास साध्य करण्यात कायद्याची भूमिका” असा आहे.

उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष दादा चौधरी राहणार असून, उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती श्री सुनिल शुक्रे, मुंबई यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मधुकर कुऱ्हाडे ( प्राचार्य,डी टी एस एस कॉलेज ऑफ लॉ, मालाड, मुंबई), महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स चे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष अंबादास मोहिते, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुनील पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, संचालक डॉ. विनय पाटील, संचालक चंदन अत्तरदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी उपस्थित राहणार आहे. सदर राष्ट्रीय परिषदेचे बीज भाषण मासवे चे संस्थापक अध्यक्ष प्रा.अंबादास मोहिते करणार आहेत.
दुपारच्या सत्रात बाल हक्क, प्रतिबंधक कायदे आणि महिला सक्षमीकरण या विषयावर संतोष शिंदे (सामाजिक कार्यकर्ते, मुंबई) यांचे व्याख्यान होईल. तसेच, परिषदेच्या विविध विषयावर आधारित बालकल्याण, महिला विकास आणि इतर सामाजिक कायदे यांवर तज्ञांची चर्चा होणार असून, देशभरातून ८१ शोधनिबंधांचे सादरीकरण. होणार आहे.
परिषदेच्या समारोप सत्राचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ. पी. आर. चौधरी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, जळगाव येथील नामांकित माजी सरकारी वकील ॲड. केतन ढाके, मासवे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते, मासवे सचिव डॉ. संजय फुलकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी उपस्थित राहतील.
दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सामाजिक कायद्यांवर वैचारिक मंथन होणार असून, सर्व प्राध्यापक, संशोधक व रिसर्च स्कॉलर्स, अभ्यासक यांनी सहभाग द्यावा असे आवाहन राष्ट्रीय परिषदेचे संयोजक डॉ. उमेश वाणी, परिषदेचे आयोजन सचिव डॉ. प्रशांत भोसले समन्वयक डॉ. यशवंत महाजन सह समन्वयक डॉ.शाम सोनवणे यांचेकडून करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

Next Post

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

Next Post
सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, - मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo