Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सहानुभूतीने मानसिक अपंगत्व देण्यापेक्षा उद्योगासाठी आर्थिक सहकार्य देऊन अपंगांचे मनोबल वाढविणे सर्वांचे आद्य कर्तव्य -नेत्रतज्ज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
सहानुभूतीने मानसिक अपंगत्व देण्यापेक्षा उद्योगासाठी आर्थिक सहकार्य देऊन अपंगांचे मनोबल वाढविणे सर्वांचे आद्य कर्तव्य -नेत्रतज्ज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील

भारतरत्न डॉ. कलाम पुस्तक भिशी तर्फे जागतिक अपंगदिनानिमित्त नृत्यविष्कार व प्रेरणादायी गीतगायन

जळगांव(प्रतिनिधी)- सहानुभूतीने मानसिक अपंगत्व अप्रत्यक्ष देण्यापेक्षा उद्योगासाठी आर्थिक सहकार्य देऊन अपंगांचे मनोबल वाढविणे सर्वांचे आद्यकर्तव्य झाले पाहिजे असे प्रतिपादन नेत्रतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले. भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक अपंग दिनानिमित्त शुक्रवार दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी दिव्यांगांच्या हृद्य सत्कार प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉक्टर पाटील बोलत होते.

प्रमुख अतिथी मातोश्री आनंदाश्रमाचे प्रकल्प सहप्रमुख संजय काळे, शामकांत जोशी, हरीभाऊ मांडवगडे, उषा भागवत उपस्थित होते. सदरहू कार्यक्रम केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री आनंदाश्रम सावखेडा बुद्रुक येथे अविनाश आचार्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड, कवी शशिकांत हिंगोणेकर, भुतपूर्व आनंदाश्रमाचे प्रकल्प सहप्रमुख उमेश जोगी, हेमंत पाटील, जयश्री पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रथम स्रत्रात जागतिक अपंग दिनानिमित्त नृत्यांगना कुमारी मानसी पाटील हीचा नेत्रतज्ञ तथा आर्या फाऊंडेशनचे समाजसेवी अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. कलाम पुस्तक भिशी तर्फे सभासदांच्या सहकार्याने रोख पाच हजारांचे आर्थिक सहकार्य शिक्षणासाठी देण्यात आले.

त्याचवेळी शाल तसेच “नोबल तिमिराकडून तेजाकडे” हे यजुर्वेंद्र महाजन संपादित प्रेरणादायी पुस्तक देऊन मानसीचा हृद्य सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिमापूजन न करता निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बहिणाबाईंच्या कविता संग्रहाचे ग्रंथपुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी इतनी शक्ती हमे देना दाता गीताचे सामुहिक गायन झाले. आनंदाश्रमाचे प्रकल्प सहप्रमुख संजय काळे यांनी जागतिक अपंगदिनाची पूर्वपिठीका सांगून अपंगदिनाचे महत्व सांगितले.

सत्कारार्थी मानसी पाटील हीची अपघातानंतरची संघर्षगाथा व कलासाधनेचा परिचय पुस्तक भिशीचे संस्थापक तथा जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी करून दिला. पुस्तक भिशीची संकल्पना, उदिष्ट्ये व कार्यवाहीही लुल्हेंनी स्पष्ट केली. लुल्हे मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, समाजाने सर्वार्थाने अपंगांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय व हक्क मिळवून देणे. उद्योग व रोजगार देऊन आर्थिक दृष्टया सक्षम करणे.

आत्मसन्मान न दुखावता समाजाच्या प्रवाहात आणत कला गुणांना व्यासपीठ देत प्रतिष्ठा देणे या बाबी समाजमनात रुजल्या की अपंगदिन साजरा करण्याची गरजच उरणार नाही.सत्कारार्थी नृत्यांगना मानसी पाटील हीने तु ही रे (सलाम बॉम्बे) व जादूकी झप्पी (रमैय्या वतावैय्या) या गाण्यांवर रेकॉर्ड डान्स सादर केल. केवळ एका डाव्या पायावर तोल सांभाळत चपळतापूर्ण नेत्रसुखद पदलालित्य व गाण्यांच्या आशयानुसार मानसीचे सात्विक हावभाव यामुळे बाबाआजी मंत्रमुग्ध झाले. नृत्य संपताच भारावलेल्या बाबाआजींनी मानसीला प्रत्यक्ष आशिर्वाद देऊन अक्षरशः गोंजारत बक्षिस देण्यासाठी झुंबड करीत प्रेमाने हितगुज केले.

मदत नव्हे आशीर्वाद म्हणा सांगणारे संवेदनशील कलाप्रेमी बाबाआजींचा अवघ्या १० मिनिटात ३४०० रुपयांचा आशीर्वाद नाना बागुल, सिताराम पाटील, हुनाजी तळेले, शामकांत जोशी, हरिभाऊ मांडवगडे, दिनकर जोशी, विजया पोतदार, मल्हांबाई कुमावत, श्रीमती सोनार, आशा क्षिरसागर, निर्मला कुलकर्णी, शांताबाई चौधरी… निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कवी विजय लुल्हे यांनी बहिणाबाईंच्या दोन कवितांचे वाचन केले.

अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर या कवितेच्या समूह गायनात सर्वांनी उत्स्फूर्तपणे ठेका धरून दाद दिल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली. बहिणाबाई चौधरींच्या कवितेंची पुस्तके विजय लुल्हे यांनी स्व .पिताश्री सुपडू सुतार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काव्यरसिक बाबा आजी वाचकांना सादर सस्नेह भेट दिली.

कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी चमत्कार सादर करून त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगत प्रबोधन केले. मातोश्री आनंदश्रमाच्या मातृपितृतूल्य बाबाआजींना पुस्तक भिशीतर्फे उत्तर दिवाळी फराळ देऊन कार्यक्रमाचा अनौपचारीक समारोप झाला. सूत्रसंचालन संयोजक विजय लुल्हे व आभार प्रदर्शन डिगंबर कट्यारे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्थिक योगदान निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर व अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी, अभियंता मिलिंद काळे व संजय भावसार, दिगंबर कट्यारे, विजय लुल्हे, श्रीमती उषा सोनार, दिशा स्पर्धा परीक्षेचे संचालक वासुदेव पाटील, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, ह.भ.प. मनोहर खोंडे, पत्रकार दिपक महाले यांचे मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कलाशिक्षक सुनिल दाभाडे, आश्रमाचे व्यवस्थापक पवन येपुरे, मदतनीस नवल पाटील, रुपेश भोई यांनी अमूल्य सहकार्य केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ठोस आराखडा करावा -अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार

Next Post

३३ व्या महाराष्ट्र राज्य महिला व पुरुष तायक्वांदो राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटील ला सुवर्ण

Next Post
३३ व्या महाराष्ट्र राज्य महिला व पुरुष तायक्वांदो राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटील ला सुवर्ण

३३ व्या महाराष्ट्र राज्य महिला व पुरुष तायक्वांदो राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटील ला सुवर्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d