Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सौ.रजनीताई देशमुख महाविद्यालयात करिअर कट्टा कार्यशाळेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
सौ.रजनीताई देशमुख महाविद्यालयात करिअर कट्टा कार्यशाळेचे आयोजन

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सुरू केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासनाच्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून जळगाव येथील श्री सुर्वे पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षांचे योग्य नियोजन करावे, कोणतीही परीक्षा ही मेहनतीने जिद्दीने यशस्‍वी होऊ शकते. आयएएस, आयपीएस परीक्षा पास करणारे साधारण विद्यार्थी जास्त प्रमाणात आहेत. ही परीक्षा पास करण्यासाठी जिद्द आणि संयमाची आवश्यकता आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एन एन गायकवाड उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयात राबवत असलेल्या या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. महाविद्यालयामध्ये ग्रंथालय सुविधा, विविध वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके यांचा जास्तीत जास्त वापर करून आपली ध्येयपूर्ती करावी, असे मत व्यक्त केले. करिअर कट्टाचे समन्वयक प्रा.डॉ. बी. एस. भालेराव यांनी बोलताना करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण करावी. वर्षभर या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉ. एस.डी. भसे, डॉ.एस. जी. शेलार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रदीप वाघ यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. जी. डी. चौधरी (उद्योजकता समन्वयक) यांनी केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सहकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सांगवी खुर्द येथील आरोपीस फाशीची शिक्षा झालीच पाहीजे रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसिलदार यांना दिले निवेदन

Next Post

ओमकारविहार कॉलनी मध्ये ओपन स्पेस चे सपाटीकरण शुभारंभ

Next Post
ओमकारविहार कॉलनी मध्ये ओपन स्पेस चे सपाटीकरण शुभारंभ

ओमकारविहार कॉलनी मध्ये ओपन स्पेस चे सपाटीकरण शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo