Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३’ चे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३’ चे आयोजन

मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एक कम्युनिकेशन्स प्रा. लि. पुणे याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर सात्मीकरण स्पर्धा पर्व-3 नावनोंदणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे हे तिसर पर्व आहे.स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वांना विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. पर्व 3 साठी नावनोंदणीस राज्यभर 8 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून 15 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. पाठ्यांचे व्हिडीओ 25 नोव्हेंबर पासून 31 डिसेंबरपर्यंत मिळालेल्या लिंकवर अपलोड करता येणार आहेत.मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थामार्फत सह-आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे.

अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून आत्मसात होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केली जाते. जिल्हा पातळी, राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जाईल. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पाढे पाठांतर स्पर्धा खली राहील विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिकत असला तरी स्पर्धा मराठी भाषेतूनच होईल. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वस्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे.

स्पर्धेचे नियोजन– जिल्हापातळीवर स्पर्धक आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणतानाचा व्हिडीओ मिळालेल्या लिंक वर अपलोड करावा. परीक्षकांकडून त्याचे परीक्षण केले जाईल

राज्यपातळीवर- परीक्षणानंतर गटनिहाय यशस्वी विद्यार्थ्यांना पायांवर आधारीत गणितीय आकडेमोड यावर आधारित प्रश्न विचारून तोंडी परीक्षण करण्यात येईल.

बक्षिसे- व्हिडिओ अपलोड केलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाईल आणि राज्यपातळीवरील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र आणि प्रत्येक गटात 19 हजार, 7 हजार, 5 हजार अशी पहिल्या 3 क्रमांकांना भारतीय टपाल विभागाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आणि सर्व सामान्य जनतेसाठी खुली आहे. त्यासाठी अंकनाद अॅपद्वारे फॉर्म भरून नोंदणी करु शकतील, अंकनाद अॅप गुगल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेचे स्वरूप आणि नियम www.mahaaanknaad.com या वेबसाइटवर बघायला मिळतील, असे संचालक, राज्य मराठी विकास संस्था संजय कृष्णाजी पाटील यांनी कळविले आहे.

स्पर्धेचा अभ्यासक्रम बालगट (बयोगट 4 ते 6) पहिली साठी अंक उच्चार 1 ते 100दुसरी, तिसरी साठी 1 ते 10 पाढ़े, 11 से 20 पाढे, 21 ते 30 पाढेचौथी पाचवी साठी पावकी, निमकीसहावी, सातवी साठी पाऊणकी, सवायकी,आठवी, नववी, दहावी साठी दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रेखुला गट आणि शासकीय कर्मचारी गटांसाठी पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे

Team Satymev Jayate

Previous Post

१५ डिसेंबर पर्यत जामनेर तालुक्यात पूर्ण होणार १००% कोरोना लसीकरण

Next Post

अ‍ॅडव्हान्टेज गोदावरी इंजिनिअरिंग चॅप्टरचा अनावरण सोहळा उत्साहात

Next Post
अ‍ॅडव्हान्टेज गोदावरी इंजिनिअरिंग चॅप्टरचा अनावरण सोहळा उत्साहात

अ‍ॅडव्हान्टेज गोदावरी इंजिनिअरिंग चॅप्टरचा अनावरण सोहळा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo